Praniti Shinde on BJP: योगी-महाराज राजकारणात आल्याने देश उद्ध्वस्त होऊ लागलायं; प्रणिती शिंदे यांचा भाजपवर निशाणा

सोलापूर येथील एका सभेला संबोधित करताना सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, ‘योगी आणि महाराजांचे स्थान राजकारणात नसून मंदिर आणि मठात आहे.'

Praniti Shinde (PC - Facebook)

Praniti Shinde on BJP: देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि महाराष्ट्रातील सत्ता आणि विरोधक यांच्यात सुरू असलेला संघर्ष यादरम्यान काँग्रेसच्या महिला आमदाराने अजब विधान केलं आहे. काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सोलापूर येथील एका सभेला संबोधित करताना सोलापूरच्या काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, ‘योगी आणि महाराजांचे स्थान राजकारणात नसून मंदिर आणि मठात आहे.'

प्रणिती शिंदे पुढे बोलताना म्हणाल्या, 'उत्तर प्रदेशच्या निवडणुका लक्षात घेऊन केंद्राने तीन वादग्रस्त कृषी कायदे मागे घेतले होते. ज्यामुळे भाजपने आरामात बहुमत मिळवले. योगी आणि महाराज जेव्हा-जेव्हा राजकारणात आले तेव्हा देशात उलथापालथ झाली.' (वाचा - Money Laundering Case: अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज PMLA न्यायालयाने फेटाळला; कारागृहातील मुक्काम लांबला)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणती शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधताना सांगितलं की, "आम्हाला योगी आणि महाराजांबद्दल आदर आहे, पण त्यांचे स्थान राजकारणात नाही, तर मंदिर आणि मठात आहे. योगी आणि महाराज राजकारणात आल्यावर लगेचचं देश उध्वस्त व्हायला सुरूवात होते."

त्या पुढे बोलताना म्हणाल्या, "काम करणाऱ्यांच्या मागे उभे राहणे गरजेचे आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर कामाला महत्त्व द्या." नरेंद्र मोदी सरकारवर टीका करताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, केंद्राने कृषी कायदे रद्द करण्यासाठी एक वर्ष लावलं. या एका वर्षात तब्बल 700 लोकांचा जीव गेला. याची भाजप सरकारला लाज वाटली पाहिजे.