अभ्यास कायम ठेवत राज्यातील १८० तालुक्यांत दृष्काळसदृश्य परिस्थितीची घोषणा

दुष्काळसदृश्य तालुके आणि राज्यातील इतर भागांची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक महाराष्ट्रात येईल. त्यानंतर योग्य ती मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अभ्यास कायम ठेवत राज्यातील १८० तालुक्यांत दृष्काळसदृश्य परिस्थितीची घोषणा
दुष्काळजन्य स्थिती (संग्रहित, संपादित आणि प्रातिनिधिक प्रतिमा)

पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश्य स्थिती असल्याने राज्यावर भयावह दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. अशा स्थितीत महाराष्ट्र सरकारचा अभ्यास अद्यापही सुरुच आहे. दरम्यान, राज्यातील १८० तालुक्यांमध्ये राज्य सरकारकारकडून दुष्काळसदृश्य स्थिती असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्य मंत्रीमंडळाची बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा मंगळवारी (२३ ऑक्टोंबर) केली.

राज्यात यंदा सरासरीच्या केवळ ७७ टक्केच पाऊस पडला असल्याचे सांगत दुष्काळसदृश्य स्थिती असणाऱ्या १८० तालुक्यांमध्ये उपाययोजना करण्यास त्वरीत सुरुवात होईल. दुष्काळसदृश्य तालुके आणि राज्यातील इतर भागांची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक महाराष्ट्रात येईल. त्यानंतर योग्य ती मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. (हेही वाचा, पंतप्रधान मोदींच्या 14 हजार कोटींच्या जगभ्रमणात काय मिळवले ? शिवसेनेचा सवाल

दरम्यान, प्राथमिक उपाययोजना म्हणून, जमीन महसूलात सूट, कृषीकर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषीपंप विजबिलात सवलत, विद्यार्थ्यांच्या परीक्षाशुल्कातही सवलत, टंचाईग्रस्त भागात टँकर, कृषीपंप जोडणी खंडीत न करणे अशी पावले उचलली जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 23, 2018 01:39 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).