कोरोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का?, आशिष शेलारांचा ठाकरे सरकारला सवाल
राज्यातील तुरुंगात कैदी ठेवण्याची क्षमता संपली असल्याने करोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता या पुढे अत्याआवश्यक असेल तरच आरोपींना अटक करावे, असे आदेश कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी बजावलेले आहेत.
एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र कोरोनाविरुद्ध मोठी लढाई लढत आहे तर दुसरीकडे कोरोना संसर्गाची भीती लक्षात घेता तुरुंगात कैदी ठेवण्यावर मर्यादा आल्याने आता भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. करोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? असा सवाल शेलार यांनी केला आहे. आशिष शेलार यांनी ट्विटद्वारे राज्य सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. राज्यातील तुरुंगात कैदी ठेवण्याची क्षमता संपली असल्याने करोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता या पुढे अत्याआवश्यक असेल तरच आरोपींना अटक करावे, असे आदेश कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी बजावलेले आहेत.
"अर्जुन सकपाळ या तरुणाने बोगस IAS प्रमाणपत्र मिळवून रत्नागिरीत जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याचा बनाव रचला. बनावट अहवाल तयार करुन भांडूपच्या ड्रीम माँलमध्ये सनराइज हाँस्पिटलला अग्निशमन दलाची परवानगी घेतली गेली!” असे भाजपा नेते आशिष शेलार यांनी या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.हेदेखील वाचा- Maharashtra COVID Vaccination: राज्याला कोरोना लसीकरणासंबंधी स्वतंत्र App असावा या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लिहिले पत्र
तसेच, "कोरोनामुळे राज्यातील जेलमध्ये कैद्यांची व्यवस्था लावणे अवघड झाल्याने महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ( कारगृह) यांनी डीजीपींना पत्र लिहून विनंती केली आहे की, छोट्या गुन्ह्यातील नवीन आरोपी अटक करणे थांबवा! तिन्ही घटना गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या आहेत." असंही शेलार यांनी सांगितलं आहे.
"कोरोनाच्या लढाईत अशा किती गोष्टी बोगस करुन सामान्य माणसे फसवली जाणार आहेत? करोनाच्या लढाईत आरोपींना अटकच करणे बंद करणार का? प्रशासन, कायदा सुव्यवस्था, राज्याचा शासकीय कारभार अशा प्रकारे ठाकरे सरकार संपूर्णत: गाठोड्यात बांधून ठेवणार आहे की काय?" असे सवाल देखील शेलार यांनी ठाकरे सरकारला उद्देशून केले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)