Maharashtra: मुंबईतील ऑफिसच्या वेळा बदलणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे महत्वाची मागणी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे नीती आयोगाची सहावी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वाढता कोरोना, लॉकडाऊनसह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे नीती आयोगाची सहावी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वाढता कोरोना, लॉकडाऊनसह अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महत्वाची मागणी केली आहे. कोरोनाचा लढा संपलेला नाही. आपणही व्हीसी वगैरेंच्या माध्यमातूनच भेटतो आहोत. कार्यालयीन वेळेच्या बाबतीतही पारंपरिक 10 ते 5 ही मानसिकता बदलून वेगवेगळ्या कार्यालयीन वेळांचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे, असा आग्रह यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे धरला आहे.
'कल करे सो आज कर, आज करे सो अभी' अशी राज्य शासनाची भूमिका आहे. कोविड काळात राज्य शासनाने विकास थांबविला नाही तर, संकटावर मात करीत मार्ग काढला आहे. कोविड संकटाचे संधीत रूपांतर केले आहे. राज्यातील शेवटच्या गावापर्यंत इंटरनेटचे जाळे पोहोचावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. तसेच कार्यालयीन वेळांचे नियोजन गरजेचे आहे. यामुळे केंद्राने राष्ट्रीय धोरण आखावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्ण संख्या जास्त असणाऱ्या भागात कंटेनमेंट झोन जाहीर करुन कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवा; मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांचे आदेश
ट्विट-
गावोगावच्या नागरिकांना माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व सेवांचा जलद, चांगला लाभ मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा व्हावी म्हणून राज्य शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी केंद्राने या प्रकल्पांना प्राधान्याने साहाय्य करावे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)