Crime: मद्यप्राशन करण्यापासून रोखल्यामुळे पत्नीची हत्या, पती अटकेत
पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या 32 वर्षीय अभियंत्याला त्याच्या दारूच्या सेवनावरून झालेल्या भांडणानंतर गुरुवारी पत्नीची हत्या (Murder) केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या 32 वर्षीय अभियंत्याला त्याच्या दारूच्या सेवनावरून झालेल्या भांडणानंतर गुरुवारी पत्नीची हत्या (Murder) केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. शिवम पंकज पचौरी उर्फ भारद्वाज असे हल्लेखोराचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. तो सध्या हिंजवडी (Hinjawadi) येथील एका अपार्टमेंटमध्ये राहतो. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्याची मृत पत्नी अवंतिका हि हिंजवडी परिसरात एका आयटी कंपनीत काम करत होती. उत्तर प्रदेशातील अवंतिकाचे वडील रंजनकुमार शर्मा यांनी शुक्रवारी हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार केल्यानंतर या संदर्भात एफआयआर दाखल करण्यात आला.
एका पोलीस उपनिरीक्षकाने सांगितले की, आरोपी शिवम आणि त्याची पत्नी अवंतिका हे दोन वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातून पुण्यात आले. दोघेही इंजिनिअर आहेत. त्यांची सुमारे पाच वर्षांपूर्वी लग्न झाली आणि त्यांना तीन वर्षांची मुलगी आहे. 9 जून रोजी रात्री आरोपी दारू प्राशन करून घरी आले. हेही वाचा Suicide: मुंबईत चोरीचा आळ आल्याने टॉवरच्या 16व्या मजल्यावरून उडी मारत नोकराची आत्महत्या
यावरून दोघांमध्ये भांडण झाले. रागाच्या भरात आरोपीने पत्नीला बेदम मारहाण केली. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. रात्री 10.30 च्या सुमारास ही घटना घडली तेव्हा त्यांचे मूल घरी होते, उपनिरीक्षक पुढे म्हणाले. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.