Waluj Explosion At Petrol Pump: दुचाकीत पेट्रोल भरत असताना अचानक फोन आला, पुढे जे घडले ते धक्कादायक

पेट्रोल पंपावर फोनवर बोलणे हे धोकादाकय ठरतं परंतु अनेकदा चेतावणी देवून सुध्दा काही लोक याची टाळाटाळ करत असतात, अशीच एक घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात घडली आहे.

explosion at petrol pump PC TW

 Waluj Explosion At Petrol Pump: पेट्रोल पंपावर फोनवर बोलणे हे धोकादायक ठरतं परंतु अनेकदा चेतावणी देवून सुध्दा काही लोक याची टाळाटाळ करत असतात, त्यामुळे स्फोट होण्याती शक्यता जास्त होते. अशीच एक घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात घडली आहे. पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरताताना फोन वर बोलणे हे एका व्यक्तीला चांगलंच भोवलं आहे. पेट्रोल भरताना त्याला फोन आला आणि फोन उचलताच दुचाकी पेटली. ही घटना समोर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. (हेही वाचा- ई-रिक्षाने दिली दुचाकीस्वाराला धडक, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडीओ)

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात ही घटना घडली आहे. दुचाीकत पेट्रोल भरण्यासाठी बजाज ऑटो समोरील पेट्रोल पंपावर आले. तेथे पेट्रोल भरत असताना अचानक त्यांना फोन आला आणि त्यांनी फोन उचलताच दुचाकी पेटली. सदर व्यक्तीने लगेच दुचाकी पेट्रोल पंपापासून दूर केली आणि कर्मचाऱ्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तात्पर्तेने आग विझवण्यात आली. आगीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. वेळात आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले जेणे करून मोठी दुर्घटना टळली.

आग कशी लागते? 

मोबाईल फोनमधील इलेक्ट्रोमेग्नेटिक रेडिएसन पेट्रोलची वाफ पेटवू शकते. त्यामुळे पेट्रोल पंपावर किमान पेट्रोल भरताना फोन उचलू नयेत.पेट्रोल पंपावर नेहमी सावधगिरी व्हा. पेट्रोल पंपाच्या 6 मीटर अंतरावरून फोन वापरा. पेट्रोल पंपावर फोन वापरल्याने स्फोट झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहे.