Ashish Shelar Viral Photo: 'तुमचं हिंदुत्व कुठे गेलं?' अभिनेता Salim Khan आणि Salman Khan यांच्यासोबत भाजप नेते आशिष शेलार यांच्या व्हायरल फोटोवर नेटिझन्सची खोचक प्रतिक्रिया
अलीकडेच आशिष शेलार लोकप्रिय अभिनेते सलीम खान आणि सलमान खान यांच्यासोबत पोज देताना दिसले. या तिघांचे छायाचित्र आशिष शेलार यांनी ऑनलाइन पोस्ट केल्याने त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
Netizens React To Ashish Shelar Viral Photo: मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) हिंदुत्व आणि संबंधित राजकारणावर केलेल्या भडक वक्तव्यासाठी ओळखले जातात. अलीकडेच आशिष शेलार लोकप्रिय अभिनेते सलीम खान (Salim Khan) आणि सलमान खान (Salman Khan) यांच्यासोबत पोज देताना दिसले. या तिघांचे छायाचित्र आशिष शेलार यांनी ऑनलाइन पोस्ट केल्याने त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. X वर प्रतिमा अपलोड करताना त्यांनी लिहिले की, 'लोकप्रिय अभिनेते सलीम खान आणि सलमान खान यांना दुपारच्या जेवणाच्या वेळी भेटून आरोग्य सेवा आणि गरजूंना मदत करण्याच्या त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल चर्चा केली. सलीमजींच्या कामाचा पाठपुरावा ऐकून मला आनंद झाला.'
आशिष शेलार यांच्या या पोस्टवर नेटीझन्स जोरदार प्रतिक्रिया नोंदवत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिलं आहे की, असे प्रदर्शन बहुतेक वेळा निवडणुकीच्या वेळीच का होतात? आता, तुम्हाला मुस्लिम लोक चांगले वाटतात का? (हेही वाचा -Kangana Ranaut Beef Controversy: 'मी गोमांस खात नाही, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे', भाजप उमेदवार कंगना रणौतने गोमांस वादावर दिले स्पष्टीकरण)
गेल्या वर्षी जेव्हा उद्धव ठाकरे समाजवादी पक्षाशी हातमिळवणी केली तेव्हा आशिष शेलार यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला होता आणि म्हटलं होत की, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (यूबीटी) यांनी हिंदुत्वाच्या विचारसरणीशी तडजोड केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाच्या विचारधारेने जगले पण आज त्याच्या मुलाने तडजोड केली आहे.
View this post on Instagram
शेलारचे हे क्षण नेटीझन्सना आठवले असून त्यांनी सलीम आणि सलमान खानसोबतची अलीकडील पोस्ट पाहून प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. यातील एका यूजर्सने म्हटलं आहे की, तुमचे हिंदुत्व (विचारधारा) आता कुठे गेले? तुम्ही तुमच्या इच्छेनुसार राजकारण करत नाही का?"
(The above story first appeared on LatestLY on Apr 08, 2024 03:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

