26 July 2005 ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी काय खबरदारी घ्याल, नेमकं काय घडलं होते तेव्हा....
त्यामुळे 2005 मध्ये ज्या गोष्टींकडे मुंबईकरांनी दुर्लक्ष केले, ज्याने कित्येक लोक दगावली तर कित्येकांचे संसार उघड्यावर पडले. असे पुन्हा होई नये म्हणून आपल्याला काय खबरदारी घेता येईल, याची थोडी माहिती आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
26 जुलै 2005.... नुसता दिवस जरी आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो. हा तो काळा दिवस ज्या दिवसाने निसर्गाने आपले रौद्र रुप अवघ्या मुंबापुरीला दाखवले. जेव्हा निसर्ग आपले रौद्र रुप धारण करतो तेव्हा काय होते, याचे ज्वलंत उदाहरण मुंबईकरांना या दिवशी पाहायला मिळाले. माणसाने निसर्गाची छेडछाड केल्यास त्याचे काय गंभीर परिणाम होतात हे मुंबईकरांना त्या दिवशी पाहायला मिळाले.26 जुलै 2005 ला मुसळधार पावसामुळे (Mumbai Flood) 1 हजारापेक्षा जास्त लोकांचा जीव गेला होता, तर 14 हजार घरं उद्ध्वस्त झाली होती. कधीही न थांबणाऱ्या मुंबईचे रस्ते ठप्प झाले होते. तर लाईफलाईन असणारी मुंबईची लोकल रेल्वे सेवाही बंद पडली होती. 27 जुलै 2005 च्या सकाळपर्यंत 944 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली होती. मुंबईची लाईफलाईन काय किंबहुना घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे मुंबईकरांचे आयुष्यच काही काळ थांबले होते असे म्हणायला हरकत नाही. या घटनेला आज 14 वर्षे पूर्ण होत आहेत.
तसेच मागील 2 दिवस पावसाने मुंबईत मुसंडी मारली आहे ते पाहता आज पुन्हा 26 जुलै 2005 ची पुनरावृत्ती पाहायला मिळू शकते असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे 2005 मध्ये ज्या गोष्टींकडे मुंबईकरांनी दुर्लक्ष केले, ज्याने कित्येक लोक दगावली तर कित्येकांचे संसार उघड्यावर पडले. असे पुन्हा होई नये म्हणून आपल्याला काय खबरदारी घेता येईल, याची थोडी माहिती आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
हेही वाचा- Flashback 26 July 2005: जुलै 2019 मध्ये मुंबईकरांना 26 जुलै 2005 चे स्मरण, पाहा किती झाला होता पाऊस?
1. प्लास्टिकचा वापर टाळणे
प्लास्टिकवर जरी सरकारने बंदी आणली असली तरीही अजून ब-याच ठिकाणी प्लास्टिकचा वापर सर्रासपणे होताना दिसतो. हे प्लास्टिक इतरत्र फेकल्याने पाणी साचते. प्लास्टिकचा निचरा होत नसल्याने नदी, नाल्यात, तलावात प्लास्टिक साचून राहते आणि पाण्याच्या प्रवाहात अडथळा आणते. म्हणून प्लास्टिकचा वापर कटाक्षाने टाळा. तसेच प्लास्टिक, थर्माकॉल, किंवा अन्य कचरा इतरत्र फेकू नका.
2. अनधिकृत झोपड्या उभारण्यास विरोध करा
26 जुलै 2005 रोजी मिठी नदी जवळील अनधिकृत झोपड्या या पूराला सर्वात जास्त कारणीभूत ठरल्या. त्यामुळे मुंबईत कुठल्याही भागात पाणी प्रवाहाच्या मार्गात अडथळा आणणा-या अनधिकृत झोपड्यांना विरोध करा. किंवा या कामासाठी पोलिसांची मदत घ्या.
3. दूरदृष्टीचा अभाव
मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात प्रकृतीचा असा कोप होईल असं कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते. त्यामुळे जो हलगर्जीपणा त्यावेळी झाला मग तो प्रशासनाचा असो किंवा सामान्य नागरिकांचा. दूरदृष्टीने विचार करुन प्रशासनाने अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि खबरदारीची योग्य ती उपाययोजना करावी. तसेच सामान्य नागरिकांनी आपल्या घरांची पक्की बांधणी करुन योग्य ती खबरदारी घ्यावी.
4. अशी नैसर्गिक आपत्ती आल्यास सुरक्षित स्थळी थांबा
अशा नैसर्गिक आपत्ती वेळी मुख्यत्वे लोक आपल्या घरी जाण्याचा मार्ग अवलंबतात. मात्र त्यावेळी ते हे विसरून जातात की, जर पावसाचा जोर हा इतका असेल तर वाहने उपलब्ध होणेही तितकेच अवघड आहे. घरी जाण्याचे मार्ग पुर्ण बंद झाले आहेत, हे जर तुम्हाला स्पष्ट झाले असेल, तर उगाच साहसी विचार करुन अवघड पर्यायांनी तुमचा जीव धोक्यात घालू नका. मोबाईल, फोन, सोशल मिडियाद्वारा आपल्या घरच्यांचा संपर्कात राहा. त्यावेळी सोशल मिडिया इतका प्रचलित नव्हता. मात्र आता अशा आपतकालीने स्थितीत तुम्ही याचा वापर करु शकता.
5. पाण्याचा अंदाज आल्याखेरीज पुढे पाऊल टाकू नका
आपल्याला समोर असलेले गुडघाभर पाणी दिसत आहे आणि तरीही आपण धोका पत्करुन पाण्यात चालण्याचा प्रयत्न करतो, हे खूपच चुकीचे आणि धोक्याचे आहे. 26 जुलैला जे लोक वाहून गेले त्यात ब-य़ाच लोकांनी या कारणामुळे आपला जीव गमावला. जीवापेक्षा काही मोठं नाही हे कायम लक्षात ठेवा.
'मुंबई मेरी जान' हे वाक्य लिहिण्यापुरता किंवा म्हणण्यापुरता करण्यापेक्षा मुंबईवर खराच तुमचा जीव असेल तर मुंबई स्वच्छ ठेवणे हे आपल्या हातात आहे. त्यासाठी योग्य ती खबरदारी घ्या, कचरा इतरत्र फेकू नका. शेवटी मुंबईकरांचे स्पिरिट हे खूप महत्त्वाचं आहे जे थांबत नाही केवळ पुढे चालत राहतं.