IPL Auction 2025 Live

Vaccination In Housing Societies: मुंबईच्या सोसायट्यांमध्ये लसीकरण करण्याबाबत महापौर किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या? घ्या जाणून

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाताना दिसत आहे.

Mumbai Mayor Kishori Pednekar (Photo Credit: ANI)

कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवण्यात मुंबई महानगरपालिकेला (BMC) मोठे यश आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाताना दिसत आहे. परंतु, दुसऱ्या लाटेचा सामना केल्यानंतर देशात कोरोनाची तिसरी लाटेचा धोका घोंगावत आहे. या संदर्भात अनेक तज्ज्ञांनी आपले मत व्यक्त केले आहे. यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने तयारीला लागले आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी मुंबईच्या सोसायट्यांमध्ये लसीकरण करण्याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

किशोरी पेडणेकर यांनी नुकतात पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी मुंबईच्या सोसायट्यांमध्ये लसीकरण करण्याबाबत भाष्य केले आहे. उद्यापासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होत आहे. रिक्षाचालक आणि फेरीवाले यांचे लसीकरण करण्याला प्राध्यान देण्याचा विचार केला जात आहे. ज्या सोसायट्यांना सोसायटीमध्येच लसीकरण शिबिरे आयोजित करायची आहे. त्यांनी महापालिकेकडे संबंधित माहिती द्यायला हवी. सर्वांनी स्वतःची आणि कुटुंबांची काळजी घेतली, तर आपण दुसऱ्या लाटेप्रमाणेच तिसरी लाट थोपवू शकू,” असा विश्वास महापौर पेडणेकर यांनी व्यक्त केला. हे देखीला वाचा- Maharashtra: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वबळाच्या घोषणेवरुन काँग्रेसवर अप्रत्यक्षरित्या टीका

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला तडाखा दिला होता. राज्यातील संसर्गाचा वेग जास्त असल्यानें दररोज बाधितांची संख्या मोठी होती. त्यामुळे आरोग्य सेवांवरही प्रचंड ताण पडला होता. असंख्य रुग्णांना वेळेत उपचार, औषधी आणि ऑक्सिजन न मिळाल्याने आपले जीव गमवावे लागले होते. मात्र, या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला मोठे यश आले आहे.

मुंबईत काल (19 जून) 696 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर, 790 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 6 लाख 88 हजार 340 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 95 टक्के आहे. तर, रुग्ण दुप्पटीचा दर 720 आहे. मुंबई सध्या 14 हजार 751 रुग्ण सक्रिय आहेत.