Maharashtra Weather Update: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचे ढग, तापमानवाढीमुळे ऊन्हाचे चटके; जाणून घ्या हवामानाचा अंदाज
यंदा उन्हाळा काहीसा अधिकच लवकर जाणवू लागला आहे ऋतुमान इतके बदलत आहे की, तापमान वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain), गारपीट आणि गारवाही पाहायला मिळत आहे.
Latest Weather Update: महाराष्ट्रात हिवाळा संपून उन्हाळ्याची (Summer) चाहूल लागली आहे. यंदा उन्हाळा काहीसा अधिकच लवकर जाणवू लागला आहे ऋतुमान इतके बदलत आहे की, तापमान वाढत असतानाच दुसऱ्या बाजूला काही ठिकाणी अवकाळी पाऊस (Unseasonal Rain), गारपीट आणि गारवाही पाहायला मिळत आहे. वातावरण बदल इतक्या वेगाने होत आहे की, हवामानाचा अंदाज बांधणे कठीण व्हावे. राज्यात पाठिमागच्याच महिन्यात अवकाळी पाऊस पडला. त्यानंतर तापमान हळूहळू वाढत आहे. हवामान विभागाने राज्यामध्ये आज (7 मार्च) तापमानाचा पारा कासीसा चढा राहणार आहे. त्यामळे अनेक ठिकाणी उन्हाचे चटके आणि उकाडा पाहायला मिळू शकते.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रात आज विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडण्याची चिन्हे आहेत. खास करुन पुढच्या 24 तासांमध्ये हिंगोली, बीड, परभणी, अमरावती या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळू शकतो. त्यासोबतच काही भागांमध्ये गारपीठही पाहायला मिळू शकते, असा हवामानाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. (हेही वाचा, Summer and Health: उन्हाळा वाढतो आहे, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करायला हवे? घ्या जाणून)
ऊन पावसाचा खेळ
राज्यामध्ये अनेक ठिकाणी ऊन आणि पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमानाच घट होऊन अवकाळी पाऊस पाहायला मिळतो आहे तर काही ठिकाणी अचानक उन्हाच्या झळा वाढून तापमानही वाढते आहे. निफाड येथे तपामानचा पारा घसरल्याची नोंद झाली. तो साधारण 7 अंशाच्याही खाली गेला. खास करुन दुपारच्या वेळी तापमान अधिक वाढते आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागते. Heat Wave Advisory In India: आला उन्हाळा; ‘उष्णतेच्या लाटे’पासून सुरक्षित राहण्यासाठी केंद्र सरकारकडून खास सल्ले!
नागरिकांनी काळजी घ्यावी
अचानक होणाऱ्या ऋतुबदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नारिकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कामाशिवाय दुपारच्या वेळी घराबाहेर जाणे टाळावे. उन्हातून जाण्याची, प्रवास करण्याची वेळ आलीच तर डोक्यावर टोपी, डोळ्यांना गॉगल लावणे महत्त्वाचे. खास करुन पाणी अधिक प्रमाणात पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये घाम येत असल्याने शरिरातील पाण्यावर त्याचा गंभीर परिणाम होतो. त्यामुळे सकस आहार आणि पाणी पिण्यावर जोर द्यावा. याशिवाय अतिथंड पदार्थ खाणे टाळावे. खास करुन बाहेरचे आईसक्रीम, बर्फाचा गोळा, कुल्फी, रस आदी गोष्टी खाणे टाळावे. उन्हाळ्यात शितपेये पिण्यापेक्षा घरी बनवलेला लिंबू सरबत, ताक, कोकम आदी गोष्टी पिण्यास प्राधान्य द्यावे, जेणेकरुन नागरिकांना आरोग्याचे प्रश्न सतावणार नाहीत. शेतकऱ्यांनीही दुपारच्या वेळी उन्हात काम करणे टाळावे, असे हवामान बदलाचे अभ्यासक सांगतात.