Weather Update: महाराष्ट्रातील जनतेला हुडहुडी! नव्या वर्षाच्या पहिल्याचं दिवशी राज्यातील पारा घसरला
२०२३ वर्षाच्या पहिल्याचं दिवशी राज्यात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे.
गेल्या आठवड्यापासून राज्यातील तापमानात मोठा चढउतार बघायला मिळत आहे. नाताळाच्या दरम्यान राज्यभरात कडाक्याची थंडी पडली. मात्र नाताळानंतर राज्यातील काही भागत ढगाळ वातावरण असुन अचानक थंडी गायब झाल्याचं बघायला मिळालं. पण गेल्या दोन दिसांपासून पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढल्याचं दिसत आहे. २०२३ वर्षाच्या पहिल्याचं दिवशी राज्यात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना हुडहूडी तर भरलीचं आहे पण राज्यातील विविध मुख्य शहरांमध्ये कडाक्याची थंडी पडत असल्याचं चित्र आहे. मुंबई, पुणे, नाशिक,कोल्हापुर, नागपूर, औरंगाबाद यासारख्या राज्यातील मुख्य शहरांमध्ये तापमानात कमालीची घसरण बघायला मिळाली आहे. तरी नवीन वर्षाच्या पहिल्याचं दिवशी राज्यात हुडहूडी भरणारी थंडी जाणवली. हवामान विभागाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
केवळ राज्यातचं नाही तर देशातील विविध राज्यात थंडीची लाट आली आहे. उत्तर भारतातील उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यात तर बर्फवृष्टी होत असुन निगेटीव्ह तापमनाची नोंद करण्यात आली आहे. तसेच दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यात देखील निच्चांकी तापमानाचा आकडा गाठला आहे. तरी पुढील काही दिवसात आणखी तापमानात घसरण होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. (हे ही वाचा:- Mumbai Air Pollution: मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा बिघडली, निर्देशांक 300 च्याही पुढे; नागरिक सर्दी, खोकला, श्वसनविकाराने त्रस्त)
राज्यात कितीही थंडी जाणवली तर मुंबईत समुद्रामुळे फारशी थंडी नसते. तरी यावेळी मुंबईत देखील विक्रमी निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई भागात सर्वात कमी तापमानाची नोंद गेल्या तीन दिवसात होत आहे. तर त्याच बरोबर पश्चिम मुंबई, मध्य मुंबईसह मुंबई उपनगर ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या भागात कडाक्याची थंडी जाणवत आहे. तरी मुंबईसह उपनगरात सकाळी आणि संध्याकाळी कमाल तापमानाची नोंद होत आहे.