Weather Update : पुढील 24 तासात राज्यासह देशाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज
दुसरीकडे हवामान विभागाकडून राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उष्णतेची लाट नागरिकांच्या सहनशिलते पलिकडे गेली आहे.
Weather Update : राज्याच्या हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तासात राज्यासह देशाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची(Rain) शक्यता हवामान (Maharashtra Weather) खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय, उन्हाची झळ (Heat Wave) चांगलीच वाढत असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तापमानात वाढ झाल्याचं अनुभवायला येत आहे. अकोला येथे देशातील सर्वाधिक 42.6 अंशाची नोंद झाली. यवतमाळ, अमरावती, अकोला जिल्ह्यात प्रचंड उष्णता अनुभवायला मिळत आहे. (हेही वाचा:Maharashtra Weather Update: उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात तापमानात होणार किंचित घट, हवामान विभागाचा अंदाज )
त्याशिवाय, राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. यात अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, हिंगोली, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांत वादळी पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह पुण्यात देखील नागरिक तापमानात वाढीने हैराण झाले आहेत. पुढील दोन महिने म्हणजे एप्रिल आणि मे महिने अतिशय उन्हाचे असणार आहेत. (हेही वाचा:Weather Update Today: महाराष्ट्रासह देशात तापमान वाढणार, सोबतच पावसाच्या सरीही बरसणार; जाणून घ्या हवामानाचा अंदाज )
31 मार्चपर्यंत पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि भारताच्या वायव्य लगतच्या मैदानी भागात पाऊस आणि काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या 24 तासांत जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये यासारख्या ठिकाणी हलका पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. उत्तर-पूर्वेकडील अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये हिमवृष्टीसह पाऊस पडला आहे.