Maharashtra Weather Alert: दिल्लीत सुरुवात, महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी बरसणार? काय म्हणतोय हवामानाचा अंदाज? घ्या जाणून
त्यामुळे संपूर्ण अंदमान आणि निकोबार, अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून मान्सूनने एक पाऊल पुढे टाकत पुढचा प्रवास सुरु केला. आता प्रतिक्षा आहे ती हाच मान्सून महाराष्ट्रात केव्हा दाखल होतो याची. मात्र, त्यासोबतच मान्सूनपूर्व पावसाची महाराष्ट्रात हजेरी लागते का? याबाबतही उत्सुकता आहे.
Pre-Monsoon Rains Update: मान्सूनचा प्रवास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सुरु झाला. त्यामुळे संपूर्ण अंदमान आणि निकोबार, अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून मान्सूनने एक पाऊल पुढे टाकत पुढचा प्रवास सुरु केला. आता प्रतिक्षा आहे ती हाच मान्सून महाराष्ट्रात केव्हा दाखल होतो याची. मात्र, त्यासोबतच मान्सूनपूर्व पावसाची महाराष्ट्रात हजेरी लागते का? याबाबतही उत्सुकता आहे. राजधानी दिल्ली येथे मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावली. त्यामुळे महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व पावसाकडे नागरिक डोळे लावून बसले आहरेत. दरम्यान, राज्यातील तापमान अद्यापही चढेच आहे. हवेतील आर्द्रताही कमालीची कमी झाल्याने उन्हाच्या झळा वाढल्या असून चटकाही जाणवत आहे. त्यामुळे वाढलेल्या उकाड्यापासून केव्हा दिलासा मिळेल याकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. दरम्यान, नाही म्हणायला काही ठिकाणी मात्र हवामान ढगाळ असल्याने थोडा वेळ का होईना उन्हापासून सूटका होते आहे इतकेच कायते सूख.
मुंबईमध्ये तापमान कायम
राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरामध्ये तापमान कायम राहीले आहे. सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी तपमान सरासरी ३४ ते ३५ अंशांदरम्यान होते. शहरातील काही ठिकाणी पाठिमागच्या दोन दिवसांमध्ये झालेल्या तापमानाची सरासरी नोंद खालील प्रमाणे-
- सांताक्रूझ- 34.6 अंश सेल्सिअस
- कुलाबा- 34.4 अंश सेल्सिअस
- माटुंगा- 40 अंश सेल्सिअस
- राम मंदिर- 36.4अंश सेल्सिअस
- मिरा रोड-36.6 अंश सेल्सिअस
- जुहू विमानतळ- 36.3 अंश सेल्सिअस
- मुंबई विमानतळ- 34.2 अंश सेल्सिअस
- महालक्ष्मी- 34.7 अंश सेल्सिअस
दिल्लीत बरसल्या सरी
दरम्यान, केरळमध्ये मान्सून दाखल होण्याच्या काही दिवस अगोदर, बुधवार, 31 मे रोजी पहाटे दिल्ली-एनसीआरच्या काही भागांत मुसळधार पाऊस पडला. तत्पूर्वी, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) संपूर्ण भागात हलक्या ते मध्यम तीव्रतेच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
ट्विट
आयएमडीने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय राजधानी आणि लगतचे क्षेत्र येथे गडगडाटी वादळ/धुळीच्या वादळासह हलका ते मध्यम तीव्रतेचा पाऊस आणि 40-60 किमी/तास वेगाने वादळी वारे वाहू लागेल. साधारणपणे हवामानाची ही स्थिती संपूर्ण दिल्ली (सफदरजंग, लोदी रोड, IGI विमानतळ), NCR (लोनी देहाट, हिंडन एएफ स्टेशन, बहादूरगढ, गाझियाबाद, इंदिरापुरम, नोएडा, गुरुग्राम, फरीदाबाद, मानेसर, बल्लभगड) गोहाना, मेहम, सोनीपत, तोशाम, रोहतक, खारखोडा, भिवानी, चरखी दादरी, झज्जर, लोहारू, फारुखनगर, कोसली, महेंदरगड, पल्लभगढ, सोनीपत , बावल, नूह (हरियाणा) भागांमध्ये पाहायला मिळेल.