Maharashtra Weather Alert: राज्यात अनेक ठिकाणी 'ऑरेंज अलर्ट'; अनेक ठिकाणी पावसाच्या सरींना सुरुवात; जाणून घ्या हवामानाचा अंदाज
अशा स्थितीत हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजामुळे (Weather Alert) शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की, संपूर्ण मे महिना अवकाळी पावसाचा असेल.
राज्यात येणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा स्थितीत हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजामुळे (Maharashtra Weather Alert) शेतकऱ्यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की, संपूर्ण मे महिना अवकाळी पावसाचा असेल. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बसरु लागल्या आहेत. काही ठिकाणी वातावरण ढगाळ झाले आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस बरसू लागला आहे. वातावरणातही गारवा पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे.
हवामान विभागाने म्हटले आहे की, पुढचे 24 तास महत्त्वाचे आहेत. या कालावधीत अनेक ठिकाणी गारपीट होऊ शकते. मुंबई आणि उपगरांसह, पुणे, कोकण, गोव्यात काही ठिकाणी तुरळक तर मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटला आहे, अशा स्थितीत शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी असे अवाहन हवामान विभागाने केले आहे. धान्य, भाजीपाला, जनावरांचा चारा अथवा इतर साहित्य याची योग्य ती व्यवस्था लावावी असेही हवामान विभागाने म्हटले आहे. (हेही वाचा, Mumbai Weather Alert: मुंबईचे तापमान वाढले, पारा आणखी चढण्याची शक्यता; उकाड्याने नागरिक कासावीस, राज्यात मात्र अवकाळीचे सावट)
अवकाळी पावसाचा इशारा दिलेले जिल्हे
मराठवाडा- छत्रपती संभाजीनगर, जालना, उस्मानाबाद, बीड, नांदेड आणि हिंगोली
उत्तर महाराष्ट्र- जळगाव, नाशिक, नंदूरबार, अहमदनगर आणि धुळे
खास करुन मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता अधिक आहे. विदर्भासाठी पुढचे 3 तर मराठवाड्यासाठी पुढचे 2 दिवस अधिक महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जरी केला आहे.