Court On Depriving Baby of Mom's Milk: बाळाला आईच्या दुधापासून दूर ठेवणे हे मुलाला ऑक्सिजनपासून वंचित ठेवण्यासारखे आहे; ठाणे सत्र न्यायालयाने आरोपीला ठोठावली 5.6 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

नवजात अर्भकाचे अपहरण करणे आणि बाळाला आईच्या दुधापासून दूर ठेवणे हे मुलाला ऑक्सिजनपासून वंचित ठेवण्यासारखे आहे, असे निरीक्षण नोंदवून ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Sessions Court) एका जोडप्याला आणि अन्य एका पुरुषाला दोषी ठरवून 5.6 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

Baby | Representational image (Photo Credits: pxhere)

Court On Depriving Baby of Mom's Milk: नवजात अर्भकाचे अपहरण करणे आणि बाळाला आईच्या दुधापासून दूर ठेवणे हे मुलाला ऑक्सिजनपासून वंचित ठेवण्यासारखे आहे, असे निरीक्षण नोंदवून ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Sessions Court) एका जोडप्याला आणि अन्य एका पुरुषाला दोषी ठरवून 5.6 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमधून (Thane Civil Hospital) 2018 मध्ये एका दिवसाच्या बाळाच्या अपहरणाच्या प्रकरणाची सुनावणी करताना कोर्टात हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

न्यायाधीश जी जी भन्साळी यांनी गुडिया राजभर (35), सोनू राजभर (44) आणि विजय श्रीवास्तव (52) यांना अपहरण आणि निर्दोष हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवले. आरोपी दाम्पत्याला सहा मुले आहेत. फिर्यादीने सांगितले की, 13 जानेवारी 2018 रोजी तक्रारदार आईला भिवंडीच्या IGM हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु नंतर गर्भधारणेच्या गुंतागुंतीमुळे तिला ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. रात्री अकराच्या सुमारास तिने बाळाला जन्म दिला आणि नवजात बाळासह तिला महिला वॉर्डात नेण्यात आले. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास गुडिया वॉर्डात आली. तिने तक्रारदार महिलेला सांगितले की, तिची आई मुलाला पाहण्यासाठी बाहेर थांबली आहे. ही महिला रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे समजून आईने मुलाला तिच्या ताब्यात दिले. (हेही वाचा -HC On Harassing Husband- Calling Womanizer: पतीला सार्वजनिकरित्या त्रास देणे, त्याला 'वूमनायझर' ठरवणे अत्यंत क्रूर: दिल्ली उच्च न्यायालयाने घटस्फोटाचा निर्णय ठेवला कायम)

तक्रारदाराच्या बहिणीने तिच्या खोलीत जाऊन मुलाची चौकशी केली असता मुलाचे अपहरण झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम एकत्र केला. (हेही वाचा - Delhi High Court: पत्नीने करवा चौथचे व्रत न पाळणे म्हणजे क्रूरता नाही, पती या आधारावर नाते तोडू शकत नाही; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्वाळा)

मुलाचे अपहरण केल्यानंतर आरोपी कल्याणच्या पिसावली गावात गेली. गुन्हे शाखा युनिट-1 ने आरोपीचा माग काढत त्याला अटक करून मुलाची सुटका केली. आरोपीविरुद्ध न्यायालयात अठरा साक्षीदारांनी साक्ष दिली. तसेच डीएनए चाचणीनेही तक्रारदार आणि तिचा पती हे मुलाचे जैविक पालक असल्याची पुष्टी झाली.

नवजात बाळासाठी आईचे दूध हे ऑक्सिजन आहे, असा निष्कर्ष न्यायाधीशांनी या प्रकरणाची सुनावणी करताना काढला. नवजात बाळाला त्याच्या आईपासून वेगळे करणे म्हणजे मुलासाठी ऑक्सिजन खंडित करणे आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा न्यायालयाने यावेळी दिला. याशिवाय आरोपीला पाचहून अधिक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.