Nitesh Rane Provocative Statement: हिंदूंकडे तिरक्या नजरेने पाहणाऱ्याला मारून टाकेल; नितीश राणेंचे प्रक्षोभक वक्तव्य, गुन्हा दाखल

रविवारी अचलपूर तालुक्यात एका हिंदू जनसभेला संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा प्रक्षोभक वक्तव्य केले. यावेळी त्यांनी ओवेसी बंधूंवर निशाणा साधला. प्रक्षोभक भाषण प्रकरणी नितेश राणे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. इमरान खान अस्लम खान यांच्या तक्रारीवरून अमरावतीच्या अचलपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अमरावतीचे एसपी विशाल आनंद यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

Nitesh Rane (फोटो सौजन्य - x/@zoo_bear)

Nitesh Rane Provocative Statement: भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. रविवारी अचलपूर (Achalpur) तालुक्यात एका हिंदू जनसभेला संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा प्रक्षोभक वक्तव्य (Provocative Statement) केले. यावेळी त्यांनी ओवेसी बंधूंवर निशाणा साधला. प्रक्षोभक भाषण प्रकरणी नितेश राणे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. इमरान खान अस्लम खान यांच्या तक्रारीवरून अमरावतीच्या अचलपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अमरावतीचे एसपी विशाल आनंद यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

काय म्हणाले नितेश राणे?

नितेश राणे म्हणाले की, 'मशिदीतून फतवे काढले जात आहेत. एकत्र बसून धमक्या देत आहेत. ती 15 मिनिटे गेली कुठे? त्यांना सांगा आम्ही इथे उभे आहोत. 15 मिनिटे खूप जास्त आहे. फक्त 5 मिनिटे द्या. उरलेल्या सर्वांचा मी मारून टाकेन. तुम्ही कोणाला धमक्या देत आहात, कोणाला आव्हान देत आहात. माझ्या आत भीती नावाचं बटन लावायला देव विसरला आहे. मला काही फरक पडत नाही.' (हेही वाचा -BJP MLA Nitesh Rane यांच्याविरूद्ध प्रक्षोभक भाषण दिल्याच्या आरोपाखाली 2 FIRs दाखल)

नितेश राणे पुढे बोलताना म्हणाले की, 'सांगली आणि अहमदनगरच्या जाहीर सभेत मी म्हटले होते की, हिंदूंकडे कोणी तिरकसपणे पाहिलं तर लक्षात ठेवा. तुम्ही (मुस्लिमांनी) पुढाकार घेऊन आमच्या भगव्या ध्वजाच्या विरोधात उभे राहिल्यास कोणत्याही मशिदीवर हिरवा झेंडा लावला जाणार नाही. तसेच जर गणेश चतुर्थीच्या वेळी जी घटना (दगडफेक) घडली तीच घटना नवरात्रोत्सवात घडली, तर वर्षभरात काढण्यात आलेली तुमची एकही उर्स आणि ईद मिरवणूक सुखरूप घरी पोहोचू शकणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. मी तुम्हाला हा शब्द देतो. कारण, ते तुम्ही सुरुवात केली आहे, ते संपवण्याचे काम हिंदू समाजच करेल. हे लक्षात ठेवा. आम्ही गप्प बसणारे नाही.' (हेही वाचा - Ravindra Waikar On Nitesh Rane: उद्धव ठाकरेंची 'मशाल' कधीच विझली आहे, नितेश राणेंचे खोचक वक्तव्य, रवींद्र वायकरांनी दिले प्रत्यूत्तर)

नितीश राणेंचे प्रक्षोभक भाषण, पहा व्हिडिओ - 

इम्तियाज जलील यांनी केली अटकेची मागणी -

एआयएमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी नितीश राणेंवर केवळ एफआयआर दाखल करून चालणार नाही, तर कारवाईही करावी, अशी मागणी केली होती. ते म्हणाले की, अल्पसंख्याकांविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर 60 एफआयआर दाखल होऊनही कारवाई होत नाही. मुख्यमंत्री आणि पोलिसांना त्यांची जबाबदारी समजायला हवी.

नितेश राणेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया -

दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले की, वादग्रस्त विधाने करूनही नितीश राणे यांच्यावर कारवाई का होत नाही? या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, नितेश राणे हे कट्टर हिंदुत्ववादी आमदार आहेत. भाजप हा सुद्धा हिंदुत्वाचा पक्ष आहे. मात्र, नितीश राणेंची काही विधाने आहेत ज्यांचे समर्थन करता येणार नाही. पक्षातील कोणीही अशा विधानांचे समर्थन केले नाही.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now