Kalyan Water Supply: कल्याण, टिटवाळ्याचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद

मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता

Kalyan Water Supply: कल्याण, टिटवाळ्याचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद
KDMC | (File Image)

Kalyan Water Supply: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मोहिली बारवे आणि टिटवाळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात यांत्रिक आणि विद्युत उपकरणाचे दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे येत्या मंगळवारी यां जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी पुरवठा सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत बंद राहणार आहे. या कालावधीत कल्याण पूर्व, पश्चिम, वडवली, शहाड, टिटवाळा परिसराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, असे महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी सांगितले.

मंगळवारी पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी एक दिवसाचा पुरेसा साठा करुन ठेवावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 28, 2023 06:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).