No Water Supply In Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये 5 आणि 6 जानेवारीस पाणीपुरवठा खंडीत

नवी मुंबईतील द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा आणि हेटवणे पाणीपुरवठा लाईनलगतच्या गावांसह अनेक नोड्सचा पाणीपुरवठा तात्पुरता थांबवला जाणार आहे.

Water Cut | Image Used For representational Purpose | Pixabay.com

Water Cut n Navi Mumbai: नवी मुंबईतील द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा आणि हेटवणे पाणीपुरवठा लाईनलगतच्या गावांसह अनेक नोड्सचा पाणीपुरवठा तात्पुरता थांबवला जाणार आहे. हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र आणि पाणीपुरवठा लाईनवरील आवश्यक देखभाल व दुरुस्तीचे काम सुलभ करण्यासाठी शुक्रवार, 5 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9:00 ते शनिवार, 6 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9:00 वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा बंद असणार आहे. दरम्यान, 5 जानेवारी 2024 रोजी सकाळी पाणीपुरवठा पूर्ववत सुरु सुरू होईल. मात्र त्याचा दाब कमी असेल. जो 6 जानेवारी 2024 च्या सकाळपर्यंत वाढेल. देखभालीच्या कामानंतर पुढचे 24 तास पाणीपुरवठा कमी दाबाने सुरु राहू शकतो.

कोणत्या ठिकाणी पाणीपुरवाठा बंद?

द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा नोडसह हेटवणे पाणीपुरवठा लाईनवरील गावांचा पाणीपुरवठा 5 जानेवारी 2024 ते 6 जानेवारी 2024 पर्यंत बंद राहणार आहे. (हेही वाचा, Mumbai Suicide Case: भाईंदर खाडी मध्ये उडी मारत व्यावसायिकाची कुटुंबियांसमोर आत्महत्या)

किती कालावधीसाठी असेल पाणीपुरवठा बंद?

हेटवणे पाणीपुरवठा लाईनवरील गावांसह द्रोणागिरी, जेएनपीटी, उलवे, खारघर, तळोजा नोड्सचा पाणीपुरवठा शुक्रवार, 5 जानेवारी 2024 रोजी सकाळी 09.00 ते शनिवार, 6 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. हेटवणे जलशुद्धीकरण केंद्र आणि पाणीपुरवठा लाईनची देखभाल व दुरुस्तीचे काम. तसेच त्यानंतर पुढील २४ तास कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.