Water Cut Navi Mumbai: देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी पाणीकपात- नवी मुंबई महापालिका
त्यामुळे या ठिकणी पाणिपूरवठा खंडीत असणार आहे.
नवी मुंबई महापालिका (NMMC) क्षेत्रातील नागरिकांना पालिका प्रशासनाकडून पाणीकपातीचा (Water Cut Navi Mumbai) इशारा देण्यात आला आहे. मान्सूनपूर्व काम आणि नियमीत देखभालीच्या कामासाठी मंगळवारी (25 मे) या दिवशी काही ठिकाणी पाणीपूरवठा बंद (Water Cut) ठेवण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, असे नवी मुंबई (Navi Mumbai) महापालिकेने म्हटले आहे. दरम्यान, पाणीकपातीदरम्यान नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा, असे अवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे.
नवी मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, उद्या (25 मे) मोर्बे तलाव ते दिघा मुख्य जलवाहिनी (Morbe Dam to Digha Main Aqueduct ) दरम्यान, देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या ठिकणी पाणिपूरवठा खंडीत असणार आहे. याशिवाय नवी मुंबई महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीपुरवठा खंडित होणार आहे. या प्रसिद्धीपत्रकात सूचविण्यात आले आहे की, बेलापूर, नेरूळ, तुर्भे, वाशी, कोपर खैराणे, घणसोली या भागातील नवी मुंबईतील इतर भागांवर परिणाम होईल.
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, कालावधीत सिडको परिसरातील कामोठे आणि खारघर येथेही थेट पाण्याचा थेट पुरवठा थांबवला जाईल. त्यामुळ बुधवारी (26 मे) कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. नवी मुंबईतील नागरिकांनी या कालावधीत जबाबदारीने पाण्याचा वापर करावा व एनएमएमसीला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.