Water Cut in Mumbai: मुंबईच्या पूर्व उपनगरात 18,19 मे दिवशी पाणीकपात; पहा कोणकोणता विभाग होणार प्रभावित

यामध्ये सोमय्या नाल्याखाली मायक्रोटनेलिंग पद्धतीने काम करणार असल्याने हा पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे.

Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

मुंबई मध्ये महानगरपालिकेकडून (BMC) पुढील आठवड्यात 24 तासांसाठी पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. बीएमसीकडून विद्याविहार (Vidyavihar) परिसरात हाती घेण्यात आलेल्या कामामुळे हा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे. दरम्यान बुधवार 18 मे सकाळी 10 वाजल्यापासून गुरूवार 19 मे सकाळी 10 वाजेपर्यंत असा 24 तास हा पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे.

बीएमसी ने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वउपनगरांमध्ये काही ठिकाणी 24 तास पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल तर उर्वरित काही भागांमध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. कुर्ला, चेंबूर, घाटकोपर, सायन, किंग सर्कल, माटुंगा, परेल या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याची माहिती बीएमसीने दिली आली आहे.

बीएमसी वॉर्ड नुसार कुठे पाणी पुरवठा विस्कळीत होईल

मुंबई महापालिकेकडून शहराच्या पूर्व उपनगरातील एन विभागात जलवाहिन्यांचे काम केले जाणार आहे. यामध्ये सोमय्या नाल्याखाली मायक्रोटनेलिंग पद्धतीने काम करणार असल्याने हा पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे. त्यामुळे त्या 24 तासांसाठी मुंबईकरांनी पुरेसा पाणीसाठा करावा असं आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.