IPL Auction 2025 Live

Water Crisis in Nashik: पाण्यासाठी महिलांची वणवण; नाशिक जिल्ह्यातील विदारक चित्र (Watch Video)

पाण्यासाठी महिलांची (Nashik Women) वणवण होत असून, घोटभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. पाठिमागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या बातम्या येत होत्या. आता त्याचीच साक्ष देणारा पेंट (Peint Village) गावातील एक व्हिडिओही पुढे आला आहे.

Water Crisis | (Photo Credits: ANI)

नाशिक जिल्ह्यात प्रचंड पाणीटंचाई (Water Crisis in Nashik) पाहायला मिळत आहे. पाण्यासाठी महिलांची (Nashik Women) वणवण होत असून, घोटभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. पाठिमागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या बातम्या येत होत्या. आता त्याचीच साक्ष देणारा पेंट (Peint Village) गावातील एक व्हिडिओही पुढे आला आहे. ज्यामुळे नाशिक जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट अधिक गहीरे झाल्याचे अधोरेखीत होते. वृत्तसंस्था एएनआयने हा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. ज्यात पाहायला मिळते की, विहिरीच्या काठावर उभ्या असलेल्या महिला दोरीच्या सहाय्याने पाणी कशा पद्धतीने शेंदत आहेत.

नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पाणीटंचाई आहे. यात प्रामुख्याने वाडा तालुक्यात येणारी . टोकरेपाडा, सागमाळ, घोडसाखरे व फणसगाव या काही गावांच उल्लेखकरावा लागेल. नाशिक जिलह्यातील पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या महिलांचा आणखी एक व्हिडिओ दोनच दिवसांपूर्वी पुढे आला होता. या व्हिडिओत डोक्यावर हंडा घेऊन तळपत्या उन्हात पायपीट करणाऱ्या महिला पाहायला मिळत होत्या. डोक्यावर एकावर एक असे दोन तीन हंडे आणि कमरेलाही एक हंडा घेऊन महिला पायपीट करत आहेत. हे चित्र इतके विदारक आहे की, कोणत्याही सहृदय माणसाच्या डोळ्यात टचकन पाणी येऊ शकेल. (हेही वाचा, Water Shortage In Nashik: नाशिकमध्ये तीव्र पाणीटंचाई, महिलांची पाण्यासाठी वणवण (Watch Video)

व्हिडिओ

नेहमीच येतो पावसाळा तसे नेहमीच येतो उन्हाळा ही म्हणही आता प्रचलित होऊ लागली आहे. नेहमीच्या पाणीटंचाईने नागरिक प्रचंड त्रस्त आहेत. त्यांच्यासी पाणी या विषयावर बोलले की, ते आपला संताप व्यक्त करतात. उन्हाळा आला की, पाणीटंचाईच्या मधळ्यांनी प्रसारमाध्यमांच्या जागा व्यापून जातात. नंतर थोडा कुठे पावसाचा शिडकावा आला की कोवळ्या उन्हात दवबिंदू नाहीसे व्हावेत तसे या बातम्याही गायब होतात. पुढे वर्षभर ना सरकारला काही वाटत ना प्रसारमाध्यमांना हा विषय लावून धरावासा वाटत. त्यामुळे नागरिकांच्या समस्या तशाच राहतात. शासनाने धोरण ठरवून याबाबत निश्चित असे निर्णय घ्यावेत. जेणेकरुन पाणीटंचाईचा मुद्दा कायमचा नाहीसा होईल. मात्र सरकार तेवढी इच्छाशक्ती दाखवणार का? असाही सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करतात.