Wagh Nakh To Return To Maharashtra: छत्रपती शिवाजी महाराजांची 'वाघनखे' फक्त 3 वर्षांसाठी ब्रिटनमधून महाराष्ट्रात परतणार; राज्यात 'या' ठिकाणी होणार प्रदर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला या भेटीत सामील होण्याची योजना आखली होती, परंतु त्यांचा यूके आणि जर्मनीचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज (Photo Credits: Instagram)

छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अफझल खानला मारण्यासाठी वापरलेल्या ‘वाघ नखां’चे (Wagh Nakh) महाराष्ट्राच्या इतिहासात विशेष महत्व आहे. सध्या शिवाजी महाराजांची ही वाघनखे ब्रिटनमध्ये आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ही वाघनखे भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु होते. आता अहवालानुसार, व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट (V&A) संग्रहालयाने महाराष्ट्र सरकारला ही वाघनखे अवघ्या तीन वर्षांसाठी देण्याचे मान्य केले आहे. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे फक्त 3 वर्षांसाठी ब्रिटनमधून महाराष्ट्रात परतणार आहेत.

ही ऐतिहासिक वाघनखे महाराष्ट्रातील चार प्रमुख संग्रहालयांमध्ये- मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय (CSMVS), सातारा येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालय आणि कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस, प्रदर्शित केली जातील.

वाघनखांची सुरक्षित वाहतूक आणि प्रदर्शन सुनिश्चित करण्यासाठी राज्य सरकारने 11 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. संस्कृती विभागाचे प्रधान सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत मुंबई आणि नागपूर येथील पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्तांसह नोकरशहा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये राज्याच्या अंतर्गत प्रदर्शनाशी संबंधित लॉजिस्टिक आणि सार्वजनिक सहभागाचे नियोजन समाविष्ट आहे. (हेही वाचा: Ek Tareekh Ek Ghanta: राज्यात 1 ऑक्टोबर रोजी राबवला जाणार 'एक तारीख एक तास' उपक्रम; जाणून घ्या स्वरूप व कसा नोंदवाल सहभाग)

सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार येत्या 3 ऑक्टोबर रोजी युनायटेड किंगडमला भेट देणार आहेत आणि व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला या भेटीत सामील होण्याची योजना आखली होती, परंतु त्यांचा यूके आणि जर्मनीचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. सामंजस्य करारावर स्वाक्षरी म्हणजे 'वाघ नखां’च्या तात्पुरत्या परतीसाठी महाराष्ट्र सरकार आणि व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय यांच्यातील अधिकृत करार.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif