Sangli Lok Sabha: सांगलीत विशाल पाटील यांची बंडखोरी, लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार
उद्या सकाळी सांगली नगरीचे आराध्य दैवत गणपतीचे दर्शन घेऊन विशाल पाटील हे रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे.
सांगली लोकसभा मतदारसंघाची (Sangli Lok Sabha Constituency) जागा महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) अधिकृतरीत्या शिवसेनेला सोडली. मात्र यामुळे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता विशाल पाटील यांनी सांगली लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. विशाल पाटील यांनी आज मोजक्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतील. काँग्रेस नेते नागपूरकडे रवाना झाल्यावर विशाल पाटलांनी निवडणूक कार्यालय गाठले . (हेही वाचा - Vishal Patil and Sangli Congress: सांगली काँग्रेस तालुका कार्यकारिणी बरखास्तीचा ठरवा, विशाल पाटल यांच्या उमेदवारीवरुन गुंता वाढला)
पाहा पोस्ट -
उद्या सकाळी सांगली नगरीचे आराध्य दैवत गणपतीचे दर्शन घेऊन विशाल पाटील हे रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, काँग्रेसकडून सांगली लोकसभा मतदारसंघासाठी विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती. विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे याआधी दिसून आले.
सांगलीच्या आखाड्यात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याविरोधात काँग्रेस बंडखोर विशाल पाटलांनी शड्डू ठोकलाय. त्यांनी हे बंड मागे घ्यावं, यासाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी चेन्नीथला यांना नागपुरात तातडीची बैठक बोलावलीय. काँग्रेस नेते आघाडीचा धर्म पाळणार का? विशाल पाटलांनी बंडखोरी कायम ठेवल्यास काँग्रेस काय भूमिका घेणार? याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.