Virat Kohli Copied Jasprit Bumrah Bowling Action: लाईव्ह सामन्यात विराट कोहलीकडून बुमराहच्या बॉलिंगची नक्कल; मजेशीर व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Photo Credit- X

Virat Kohli Copied Jasprit Bumrah Bowling Action: भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत बांगलादेशच्या 3 फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली आहे. कानपूर कसोटीत क्षेत्ररक्षण करत असताना, भारतीय खेळाडू मस्ती करताना दिसून आले. दरम्यान सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी विराट कोहली, यशस्वी जयस्वाल आणि रविंद्र जडेजासमोर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची कॉपी (Virat Kohli Copying Jasprit Bumrah)करताना दिसून आला आहे. हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल(Virat Kohli Funny Video) होत आहे.

विराटने बुमराहची गोलंदाजी अॅक्शन कॉपी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याने अनेकदा लाईव्ह सामन्यात बुमराहच्या गोलंदाजी अॅक्शनची नकल केली आहे. बुमराहने या सामन्यातील पहिल्या दिवशी 9 षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने 19 धावा खर्च केल्या. मात्र त्याला एकही गडी बाद करता आलेला नाही. गेल्या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने 4 फलंदाजांना माघारी धाडलं होतं.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात बांगलादेशचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. बांगलादेशला पहिल्या दिवशी 3 गडी बाद 107 धावा करता आल्या आहेत. बांगलादेशकडून नजमूल हुसेन शांतोने 31 धावा केल्या. तर मोमिनूल हक 40 धावांवर नाबाद आहे. भारताकडून गोलंदाजी करताना आखाश दीपने 2 गडी बाद केले. तर आर अश्विनला 1 गडी बाद करता आला आहे.