Mumbai: गर्भवती आईच्या मारहाणीत दोन वर्षांच्या चिमूकल्याचा मृत्यू; विरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
ही घटना विरार (Virar) येथील पूर्व फुलपाडा परिसरातील पारिजात अपार्टमेंट येथे शनिवारी (7 ऑगस्ट) घडली. विरार पोलीसांनी (Virar Police) या प्रकरणात गर्भवती आई (Pregnant Mother) विरोधात हत्येचा (Murder) गुन्हा दाखल केला आहे.
गर्भवती आईने केलेल्या बेदम मारहाणीत एका दोन वर्षीय चिमूकलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना विरार (Virar) येथील पूर्व फुलपाडा परिसरातील पारिजात अपार्टमेंट येथे शनिवारी (7 ऑगस्ट) घडली. विरार पोलीसांनी (Virar Police) या प्रकरणात गर्भवती आई (Pregnant Mother) विरोधात हत्येचा (Murder) गुन्हा दाखल केला आहे. आईने रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. पोलीस सदर प्रकरणाचा तपास करत आहेत. नेहा सोनुकुमार सोनी (वय 22 वर्ष) असे आरोपी असलेल्या आईचे नाव आहे. चिमूकलीच्या मृतदेराच्या शवविच्छेदन अहवालावरुन पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी महिला ही आपला पती आणि दोन मुलींसोबत राहात होती. तिचा पती रिक्षाचालक आहे. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. मारहाणीत मृत्यू झालेली मुलगी ही सर्वात मोठी आहे. दुसरी मुलगी छोटी आहे. दरम्यान, ही महिला तिसऱ्या वेळी गर्भवती आहे. किरकोळ कारणावरुन संतापलेल्या नेहा सोनुकुमार सोनी हिने मुलीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत फटका वर्मी लागल्याने मुलगी जागेवरच बेशुद्ध पडली. महिलेने घटनेची माहिती पतीला दिली. दोघांनी मिळून मुलीला विरार पश्चिम ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषीत केले. (हेही वाचा, Pimpri Chinchwad: वेडा म्हणून चिडवण्यावरून तरुणाची हत्या, पिंपरी-चिंचवड येथील घटना)
मुलीच्या वडीलांनी (महिलेचा पती) दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अकस्माक मृत्यूची प्राथमिक नोंद केली होती. दरम्यान, मुलीचा शवविच्छेदन अहवाल सोमवारी प्राप्त झाला. या अहवालात मुलीच्या डोक्यावर, अंगावर अंतर्गत जखमा आढळून आल्या. त्यावरुन तिला मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे विरार पोलिसांनी मुलीच्या आई विरोधात गुन्हा दाखल केला. विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, आरोपी महिला ही घरात वारंवार भांडण करत असे. मुलांना शिविगाळ आणि मारहाण करत असे. आजूबाजूच्या लोकांना मुलांच्या रडण्याचा आणि मोठमोठ्याने ओरडण्याचा नेहमी आवाज येत असे. शेजापाजारी कोणी सोडविण्यास गेले तर सदर महिला ही उलटसुलट बोलून भांडण काढत असे व सोडविण्यास आलेल्या लोकांना हकलून देत असे. आजही तशाच रागातून नेहमीप्रमाणे केलेल्या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला असल्याचे शेजाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले.