IPL Auction 2025 Live

विरार: मनसे महामोर्चा नंतर अर्नाळा येथून 23 बांग्लादेशी नागरिकांना अटक

मनसे महामोर्चा नंतर विरार (Virar) पश्चिमेकडील अर्नाळा सागरी पोलिस ठाण्या अंतर्गत दहशदवाद विरोधी पथक व अनैतिक मानवी वाहतूक शाखेने कारवाई करून 23 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा | (File photo)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली सुरु मनसे महामोर्चा (MNS Mahamorcha) काढत महाराष्ट्रातील अवैध पाकिस्तानी (Pakistani) आणि बांग्लादेशी नागरिकांना (Bangladeshi Citizens) बाहेर काढण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर विरार (Virar) पश्चिमेकडील अर्नाळा सागरी पोलिस ठाण्या अंतर्गत दहशदवाद विरोधी पथक व अनैतिक मानवी वाहतूक शाखेने कारवाई करून 23  बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या मध्ये एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश असल्याचे समजतेय. आश्चर्य म्हणजे यातील अनेक नागरिक हे कित्येक वर्षांपासून याच भागात राहत असून त्यांना उत्तम मराठी सुद्धा बोलता येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 'दगडाला दगडाने तर तलवारीला तलवारीने यापुढे उत्तर देणार', आझाद मैदानातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा घुसखोरांना सज्जड दम

प्राप्त माहितीनुसार, हे सर्व बांगलादेशी भंगारचा व्यवसाय व मोलमजुरी करण्यासाठी आले होते असे ,पोलीस तपासात उघड झाले आहे.मंगळवारी रात्री 11 वाजल्यापासून ही कारवाई करण्यात आली असून आज बुधवारी या प्रकरणी पहाटे 4 वाजता अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पालघर अनैतिक वाहतूक शाखेचे महेश गोसावी यांना अर्नाळा विभागात बांगलादेशी असल्याची खबर देण्यात आली होती. पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे,दहशदवाद विरोधी पथकाचे मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या मदतीने त्यांनी ही कारवाई करताना 23 बांगलादेशीना ताब्यात घेतले आहे. यावेळी विरार पश्चिम येथील कळंब ,अर्नाळा परिसरातून मनसेचे नालासोपारा शहर उपाध्यक्ष संजय मेहरा यांनी पंच म्हणून पोलिसांच्या जोडीला उभे राहून कारवाईसाठी मदत केली. यामुळे पळून जाणाऱ्या बांगलादेशींना पकडण्यास मदत केली.