Virar Hospital Fire: विरार च्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आग प्रकरणी दोन प्रशासकांना अटक
दिलीप शाह आणि चीफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह शैलेश पाठक यांना अटक करण्यात आली आहे.
Virar Hospital Fire: विरार मधील विजय वल्लभ रुग्णालयातील आयसीयुच्या वॉर्डात लागेल्या आगीच्या दुर्घटनाप्रकरणात आता चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डॉ. दिलीप शाह आणि चीफ अॅडमिनिस्ट्रेटिव्ह शैलेश पाठक यांना अटक करण्यात आली आहे. आगीच्या प्रकरणी रुग्णालयातील 15 रुग्णांचा मृत्यू झाला असून शुक्रवारी ही घटना घडली आहे. मिरा भायंदर वसई विरारच्या गुन्हे शाखेकडून या दोघांना कोर्टात हजर केले जाणार आहे.(Virar Hospital Fire Update: विरार च्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आग प्रकरणी कर्मचारी, व्यवस्थापन आणि डॉक्टरांविरूद्ध गुन्हा दाखल)
अर्नाला किनारपट्टी पोलिसांनी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांसह वैद्यकिय कर्मचाऱ्यांवर आयपीसी कलम 304, 337,338 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तर गेल्या वर्षात मार्च महिन्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर वल्लभ रुग्णालयात कोरोनाग्रस्तांना उपचार देण्यासाठी परवानगी दिली गेली. 90 घाटा असलेल्या या रुग्णालयात शुक्रवारी मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास आयसीयुमधील एसी युनिटमध्ये स्फोट झाला. यामध्ये 15 रुग्णांचा मृत्यू झाला. यामधीलच दोन जणांनी आपला जीव वाचवला त्यांचा सुद्धा नंतर आगीमुळे जखमा झाल्याने मृत्यू झाल्याची माहिती दिली गेली आहे.
ज्या दोन महिलांचा प्रथम बचाव करण्यात आला त्यांना चंदनसर कोविड केअर हॉस्पिटल आणि प्रियदर्शनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या ठिक असून त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. तर अन्य 70 रुग्ण जे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर होते त्यांना वसई आणि दहीसर येथील जम्बो कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे.
हॉस्पिटलने गेल्याच महिन्यात आगी संबंधित परवाना रिन्यू केला होता. नातेवाईकांनी असा आरोप केला आहे की, फक्त दोन नर्स आणि फक्त दोन वॉर्ड बॉयच त्या रात्री संपूर्ण रुग्णालयात होते. त्याचसोबत डॉक्टर्स आणि नाईट ड्युटीवर येणारे सुद्धा आग लागली तेव्हा नव्हते. रुग्णालयाकडे पाणी शिंपडण्यासंबंधित कोणतीच सुविधा नाही आहे.(Virar Hospital Fire Incident: विरार च्या Vijay Vallabh COVID Care Hospital आग दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक; मृतांच्या वारसांना जाहीर केली मदत)
अग्निशमन दलाकडून असे सांगण्यत आले की, आम्ही सर्वत्र पाण्याचा फवारा मारला. तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी असे म्हटले की, आम्ही अग्निशमन दलाला फोन करण्याच्या 15 मिनिटांपूर्वी आगीच्या घटनेपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत होते.