आता IRCTC कडून बुक होणार शिर्डीतील साईबाबांचे VIP दर्शन तिकीट

26 जानेवारी पासून IRCTC कडून शिर्डी (Shirdi) मधील साई बाबांच्या (Sai Baba) व्हिआयपी (VIP) दर्शनासाठी तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

शिर्डी साई बाबा दर्शन (फोटो सौजन्य- फेसबुक)

26 जानेवारी पासून IRCTC कडून शिर्डी (Shirdi) मधील साई बाबांच्या (Sai Baba) व्हिआयपी (VIP) दर्शनासाठी तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शनिवार पासून साईबाबांच्या व्हिआयपी दर्शनासाठी बुकिंग सुरु होणार आहे. शिर्डी साई नगर, कोपरगाव, मनमाड, नाशिक किंवा नागरसोलसाठी बुक करणाऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी जर व्हिआयपी तिकीट बुक केली असेल तर त्यांना रांगेशिवाय दर्शन घेता येणार आहे. तसेच ज्या भाविकांचे व्हिआयपी टिकीट कन्फर्म होईल त्यांनाच हा लाभ घेता येणार आहे. तिकीट बुक केल्यानंतरच साईबाबांच्या व्हिआयपी दर्शनाच्या तिकीटाचे ऑप्शन दिले जाणार आहे. तसेच दर्शनापूर्वी 60 दिवस अगोदरच तिकीटांचे बुकिंग करावे लागते. तर आयआरसीटीसी कडून तिकीट बुक केल्यास 120 दिवस अगोदर तिकीट बुक करावी लागते.

शिर्डीसह आयआरसीटीसी तिरुपती बालाजी, सिद्धीविनायक मंदिर आणि रामेश्वर सारख्या प्रसिद्ध मंदिरात अशा पद्धतीची सुविधा सरु करण्याचा विचार करत आहेत.