शिवजयंतीच्या तारखेवरून वाद; विनायक मेटे यांचा शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
या वादातून शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अमंलबजावणी
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) म्हणजे महाराष्ट्राचे दैवत. राज्यात शिवाजी महाराजांचे अनेक उत्सव साजरे केले जातात. त्यात त्यांची जयंती (Birth Anniversary) म्हणजे शिवप्रेमींसाठी एक पर्वणीच. मात्र दरवर्षी प्रमाणे यंदाही तारीख आणि तिथीचा वाद सुरु झाला आहे. या वादातून शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अमंलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा (Shiv Smarak Chairman) राजीनामा दिला आहे. आपला राजीनामा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
मेटे हे 2015 पासून समितीच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत. विनायक मेटेंची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
विनायक मेटे राजीनामा -
येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्याची मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांना आवाहन करावे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. ठाकरे सरकारने शिवजयंती यापुढे 19 फेब्रुवारीलाच साजरी करावी, असे जाहीर आवाहन शिवसैनिकांना करावे, असे मेटे यांचे म्हणणे होते. मात्र शिवसेने बद्दल बोलायचे झाले तर शिवसेना आजवर तिथीनुसारच शिवजयंती साजरी करत आली आहे. याच वादातून आता मेटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (हेही वाचा: बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून राजमाता जिजाऊनगर करण्याची मागणी)
'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या नेतृत्वाखाली महाविकासआघाडीचे सरकार सत्तेवर आले असल्यामुळे आपल्या विचारानुसार इतर विकासाची कामे होणे अपेक्षित आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुद्धा आपल्या विचाराने व्हावे' म्हणून आपण राजीनामा देत असल्याचे मेटे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्रात उभारले जाणार आहे. सध्याच्या प्रस्तावानुसार शिवस्मारकाचा पुतळ्याची उंची 123.2 मीटर, तर चबुतरा 88.8 मीटर आहे.