IPL Auction 2025 Live

Villager Killed By Naxalites In Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून गावकऱ्याची हत्या

गावाच्या बाहेरील भागात त्यांची हत्या करण्यात आली.

Death | Representative Photo (Photo Credit: PTI)

Villager Killed By Naxalites In Gadchiroli: गडचिरोली जिल्ह्यात (Gadchiroli District) एका 38 वर्षीय व्यक्तीची नक्षलवाद्यांनी (Naxalites) गळा दाबून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरची तालुक्यातील (Korchi Taluka) मोरकुटी गावातील (Morkuti Village) रहिवासी असलेल्या चमरा मडावी (Chamra Madavi) यांना शनिवारी रात्री उशिरा नक्षलवाद्यांनी त्यांच्या घरातून उचलून नेले. गावाच्या बाहेरील भागात त्यांची हत्या करण्यात आली.

नक्षलवाद्यांना दारूगोळा पुरवण्याच्या प्रयत्नात त्याला गेल्या वर्षी मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात अटक करण्यात आली होती, असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले. मृत व्यक्तीची बहीण देखील नक्षलवादी असून तिचा विवाह माओवाद्यांच्या विभागीय समिती सदस्य (DVC) मानसिंग होलीशी झाला आहे. (हेही वाचा -Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये पोलिसांच्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा)

मडावीने दारूगोळ्याच्या पुरवठ्यासाठी नक्षलवाद्यांकडून पैसे घेतल्याचा संशय असून त्यातूनच त्याची हत्या झाली असावी, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात छत्तीसगडमधील कांकेर येथील एका गावात नक्षलवाद्यांनी पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून तीन गावकऱ्यांची हत्या केली होती. (हेही वाचा - गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तहसील जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या सी -60 युनिटशी झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार)

प्राथमिक माहितीचा हवाला देत पोलिसांनी सांगितले होते की, कुल्ले कतलामी (35), मनोज कोवाची (22) आणि दुग्गे कोवाची (27) हे मोरखंडी गावातील रहिवासी होते. तथापी, घटनास्थळी फेकलेल्या पॅम्फलेटमध्ये माओवाद्यांनी दावा केला आहे की, हे तिघे महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षलविरोधी एक उच्चभ्रू युनिट सी-60 साठी गुप्तचर म्हणून काम करत होते.