आगामी विधानसभा निवडणूकीसाठी आचारसंहिता 13 सप्टेंबर पासून लागू होणार- रावसाहेब दानवे

तसेच निवडणूकीसाठी रणनिती आखण्यास सुद्धा सुरुवात झाली असून राजकीय पक्षांतर गेल्या काही दिवसांपासून दररोज सुरु आहेच.

रावसाहेब दानवे (Photo Credit : Facebook)

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी (Vidhan Sabha Election) राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच निवडणूकीसाठी रणनिती आखण्यास सुद्धा सुरुवात झाली असून राजकीय पक्षांतर गेल्या काही दिवसांपासून दररोज सुरु आहेच. पण विधानसभा निवडणूकीसाठी आचारसंहिता येत्या 13 सप्टेंबर पासून लागू होणार असल्याचे मोठे विधान भाजप (BJP) पक्षाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केल आहे.

जालना मध्ये ओबीसी समाजाच्या कार्यक्रमादरम्यान रावसाहेब दानवे यांनी विधानसभा निवडणूकीबाबत आचारसंहितेची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे 13 सप्टेंबरपूर्वी जनदेश यात्रा सुरु राहणार आहे. तसेच राजकरणात ओबीसी समाजाला दर्जा देण्यासाठी सुद्धा मागणी करणार असल्याचे ही दानवे यांनी म्हटले आहे.(पुढील विधानसभा निवडणूकीसाठी विरोधीपक्ष नेता वंचित बहुजन आघाडीचा असेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

तसेच निवडणूक आयोगाकडून अद्याप विधानसभेच्या निवडणूकीच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मात्र 13 तारखेलाच आयोगाकडून निवडणूकीची तारीख स्पष्ट करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र दोन दिवसांपूर्वीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 12 तारखेपासून आचारसंहिता लागू होईल असे विधान केले होते.