Prabha Atre Laid To Rest With State Honours: ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे (Prabha Atre) यांच्या पार्थिवावर पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्र.सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, पोलिस उपायुक्त संदीप गिल, स्वरमयी गुरुकुलचे प्रसाद भडसावळे व संजीव महाजन यांनीही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवास पोलीस दलातर्फे शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. (हेही वाचा - Prabha Atre Passes Away: जेष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन)

प्रभा अत्रे यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली. अनेक राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्वीट शेअर करुन प्रभा अत्रे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं "स्वरयोगिनी, संगीत विचारवंत , लेखिका अशी बहुआयामी ओळख असलेल्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे आज निधन झाले.