वसुंधरा वाहिनी आयोजित उखाणा स्पर्धेत प्लॅस्टिक बंदीचा जागर..!

मराठी संस्कृतीमध्ये उखाण्याला महत्त्व आहे. स्पर्धेच्या माध्यमातून वेगेवेगळे विषय दिले जातात

वसुंधरा वाहिणी आयोजित उखाणा स्पर्धेाला महिलांचा उत्साहात प्रतिसाद.

बारामती: विद्याप्रतिष्ठान संचलित वसुंधरा वाहिनी या कम्युनिटी रेडियोच्या वतीने आयोजित कला अविष्कार दि २० सप्टेंबर रोजी संपन्न झाला. महिलांनी प्लास्टिक बंदी संदर्भातील उखाणा स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदवला. त्यांनी उखाण्याच्या माध्यमातून प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश दिला. हा उपक्रम वाहिनीच्या वतीने विद्याप्रतिष्ठानच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सभागृहात संपन्न झाला.

वसुंधरा वाहिनीच्या माध्यमातून कला व संस्कृती संवर्धनासाठी प्रतिवर्षी उखाणा स्पर्धेचे आयोजन केले जाते. मराठी संस्कृतीमध्ये उखाण्याला महत्त्व आहे. स्पर्धेच्या माध्यमातून वेगेवेगळे विषय दिले जातात. तसेच, उखाण्याच्या माध्यमातून प्रबोधन केले जाते. या वर्षी “प्लॅस्टिक मुक्ती” या विषयाला अनुसरून महिलांनी उखाणे सादर करत स्पर्धा यशस्वी केली. या विषयीचे निवेदन वाहिनीवर प्रसारित करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत माळेगाव, माळशिरस, पळसदेव व बारामती परिसरातील महिलांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये अलका शरद रसाळ (बारामती), कांचन भगवान बावळे (माळशिरस) व रेश्मा काळे (माळेगाव) यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांची पारितोषिके मिळाली. या स्पर्धेचे परीक्षण नयन देशपांडे यांनी केले.

या वेळी महिलांनी भारुड, वैयाक्तिक गायन व नाट्यछटा यांचे देखील सादरीकरण केले. उपक्रमाच्या यशश्वीतेसाठी वसुंधरा वाहिनी महिला मंच समन्वयिका राजश्री आगम यांनी मुख्य संयोजन केले. तर, निवेदिका स्नेहल कदम, ऋतुजा आगम व प्रियांका कोठावळे यांनी योगदान दिले. बक्षिस वितरण समारंभास ज्योती बोधे उपस्थित होत्या.