Wardha Shocker: वर्ध्यात धकादायक प्रकार तरुणीच्या अंगावर फेकलं अॅसिड युक्त द्रव, आरोपी पोलीसांच्या ताब्यात

तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असताना लग्नाला नकार दिल्याने आरोपीने थेट आपल्याच प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केला आहे.

Crime | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Wardha Shocker:  गेल्या महिन्यात पुण्यात लग्नाला नकार दिल्यामुळे एमपीएससी (MPSC) पास झालेल्या दर्शनाच्या प्रियकराने तीचा जीव घेतला. ही घटना ताजी असताना देखील वर्धातील (Vardha) एका तरुणाने आपल्या प्रियसीवर अॅसिड सारखे द्रव फिकून तीच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. वर्धात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पुन्हा एकदा मुलीच्या सुरक्षितेच्या प्रश्न उभा राहीला आहे. तीन वर्षांपासून रिलेशनशिप मध्ये असलेले या प्रियकराने प्रियसीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहे.

कौस्तुभ सेलवते असं या आरोपीचे नाव आहे. तीन वर्ष  पीडित तरुणीसोबत रिलेशनशीप मध्ये होती. अशी माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीने प्रियकराला लग्नासाठी नकार दिल्यामुळे आरोपीने पीडीत तरुणीवर रस्त्यावर चालत असताना अचानक मागून येवून अॅसिड सारखे द्रव  अंगावर फेकलं. वर्धा जिल्ह्यातील रामनगर परिसरातील  ही घटना घडली आहे. पीडित तरुणीवर अॅसिड फेकल्यामुळे तीचं मानेचा काही भाग जळला आहे. सद्या तीच्यावर रुग्णाललात उपाचार चालू आहेत.

पीडीताच्या म्हणण्यानुसार हे दोघंही एक वर्षांपासून एकमेंकांपासून दूर आहेत. अर्थात एकमेकांच्या संपर्कात नव्हते. गेल्या काही दिवसांपासून कौस्तुभने लग्नाची मागणी केली होती. त्यावेळी तरुणीने त्याला नकार दिला. पीडीत तरुणी त्याच्या पासून लांब राहण्याचा प्रयत्न करत होती.  पीडीत तरुणी रविवारी दुकानात जात असताना तीचा पाठलाग केला तीच्या वर टोकेरी वस्तूने तिच्यावर हल्ला केला. तरुणी आरडाओरड करत  घराच्या दिशेने वळत होती त्याच दरम्यान आरोपीने तरुणीवर अॅसिट सारखे द्रव अंगावर फेकलं. पोलीसांना कळताच घटनास्थळी धाव घेतला. पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतल आहे. आरोपी सोबत त्याचा मित्र सुध्दा मदतीला असल्याचे समोर आले आहे. पोलीस आरोपीच्या मित्राच्या शोधात आहे. आरोपी कौस्तुभ पोलीस कोठडीत आहे.