Lok Sabha Election 2024: 'वंचित बहुजन आघाडी'मुळे भाजप आणि नरेंद्र मोदी यांना फायदा; पृथ्वीराज चव्हाण यांची अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका
वंचितमुळे भाजप आणि मोदींना फायदा होत आहे, असं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. चव्हाण पुढे म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे फार मोठे नेते आहेत. एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. मी त्यांची
वंचितमुळे मागील वेळी सुशीलकुमार शिंदे यांची सोलापूरची जागा गेली आहे. वंचितमुळे भाजप आणि मोदींना फायदा होत आहे, असं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. चव्हाण पुढे म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे फार मोठे नेते आहेत. एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. मी त्यांची वेळ मागावी आणि त्यांच्याशी चर्चा करावी एवढी माझी उंची नाही. माझी आंबेडकरी जनतेला विनंती आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला मतदान केल्यामुळे कुठल्या पक्षाला फायदा होतो? आज एकतर इंडिया आघाडी देशात सरकार स्थापन करेल किंवा मोदी पंतप्रधान होतील. सोलापूरमध्ये आज पत्रकारांशी बोलताना ते असं म्हणाले आहे. (हेही वाचा - Lok Sabha Election 2024: सत्तेत आल्यास कर्जमाफी आणि कृषी आयोगाच्या स्थापनेचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आश्वासन)
''वंचितने महाविकास आघाडीमध्ये यावे यासाठी आम्ही प्रयत्न केले,दोन्ही बाजूने प्रयत्न झाले, हे खरं नाहीये. मी कधीही त्यांच्याकडे गेलो नाही आणि त्यांची वेळ मागितली नाही, त्यामुळे हे खोटं आहे. जगावटपामध्ये माझा कांही रोल नव्हता.आमची तीन लोकांची समिती होती. त्यामध्ये काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, विरोधीपक्ष नेते आणि सभागृह नेते होते. त्यामुळे मी त्याच्याकडे जाणे, त्यांची वेळ मागणे आणि त्यांना विनंती करणे हे ते कशाच्या आधारावर बोलतायत माहिती नाही.'' असे देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.
''सोलापूरमध्ये वंचितच्या उमेदवाराने माघार घेतलीय, त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. 2019 मध्ये मोदींच्या विरोधात एकास एक उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न असताना, अनेक उमेदवार उभे करून विरोधीपक्षाची मत विभाजन करण्याचा प्रयत्न झाला. वंचित आघाडीच्या उमेदवारीमुळे सोलापूरसह 7 जागांवर आमचं नुकसान झालं आणि भाजपचे खासदार निवडून आले. एका ठिकाणी तर एमआयएमचा खासदार ही निवडून आला.'' असे देखील यावेळी चव्हाण हे म्हटले.