UTS Mobile App Update: मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी मोबाईल तिकीट बुकिंगच्या सेवेत मोठा बदल; अनेक प्रवाशांचा वेळ वाचणार

रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलेल्या नव्या सूचनांनुसार, आता प्रत्येक झोन मध्ये 7 नोव्हेंबर पासून हा तिकीट बुकिंगचा नियम लागू असणार आहे.

ऑनलाईन तिकिट बुकिंग (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

मुंबई लोकल (Mumbai Local) ही सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लाईफलाईन समजली जाते. गर्दीच्या वेळेस किंवा घाईत असताना मोबाईल अ‍ॅप, The UTS mobile app वरून थेट तिकीट काढून लोकल ट्रेन पकडणं याला अनेक प्रवासी आता प्राधान्य देत आहेत. मुंबई लोकलच्या प्रवाशांना आता हीच ऑनलाईन तिकीट काढण्याची सुविधा अजून फायद्याची झाली आहे. पूर्वी 2 किमी अंतराच्या परिघामध्ये तिकीट बूकिंगची असलेली ही सोय आता 5 किमी पर्यंत करत रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. उपनगरामध्ये ही 5 किमी वरून 20 किमी करण्यात आली आहे.

त्यामुळे ट्रेन बदलून प्रवास करणार्‍या प्रवाशांचा आता वेळ वाचणार आहे.

रेल्वे बोर्डाकडून देण्यात आलेल्या नव्या सूचनांनुसार, आता प्रत्येक झोन मध्ये 7 नोव्हेंबर पासून हा तिकीट बुकिंगचा नियम लागू असणार आहे. यासाठी अनेकदा प्रवाशांकडून मागणी समोर येत होती. कोणतीही क्षेत्रीय रेल्वे जी 5 किमीचे हे निर्बंध 10 किमीपर्यंत वाढवू इच्छित असेल, त्यांनी CRIS ला इच्छित अंतराच्या निर्बंधाची माहिती द्यावी, असे देखील रेल्वेकडून सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे देखील नक्की वाचा: Mumbai Local Update: ब्रिटीशकालीन कारनाक पूल तोडण्यासाठी मध्य रेल्वेकडून 19 नोव्हेंबरच्या रात्रीपासून 27 तासांचा ब्लॉक जाहीर .

The UTS mobile app वर प्रवाशांना सीझन तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट, मासिक पास, रोजचं तिकीट अशा प्रकारच्या तिकीट बुकिंगची सोय आहे. यामुळे रेल्वे स्थानकांत लांब लचक रांगेत उभं राहण्याचा वेळ वाचतो. हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉईड, आयओएस आणि विंडोजच्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध आहे. हे डाऊनलोड साठी मोफत उपलब्ध आहे. तसेच पेमेंट साठी देखील रेल्वेच्या R- Wallet सोबत PayTM, Mobikwik सारखे पर्याय उपलब्ध आहेत.