महाराष्ट्र: पुण्यात बुरखा परिधान केलेल्या डॉक्टरला अमेरिकन महिलेने केली मारहाण, गुन्हा दाखल
आरोपीने पहिले तिला विचारले की ती मुसलमान आहे का? जेव्हा पीडितेने 'हो' असे उत्तर दिले तेव्हा अमेरिकन महिलेने तिच्याबरोबर गैरवर्तन केले आणि तिला मारहाण करण्यास सुरवात केली.
महाराष्ट्रात (Maharashtra) पुण्यात (Pune) एक बुरखा परिधान केलेल्या डॉक्टरवर अमेरिकन महिलेने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. असे म्हटले जात आहे की बुरखानशी महिलेवर 43 वर्षीय अमेरिकन महिलेने हल्ला केला आहे. पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार, तिच्यावर अमेरिकन महिलेने अत्याचार केला आणि मारहाण केली. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. छावणी भागातील क्लोवर सेंटर बाजारात ही घटना घटली. दोन्ही महिला खरेदी करण्यासाठी बाजारात आल्या होत्या, तेव्हा अमेरिकन महिलेने डॉक्टर महिलेवर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खरेदी दरम्यान या दोन महिलांमध्ये वाद झाला आणि नंतर तो थांबला.
तक्रारदार म्हटले की, आरोपीने पहिले तिला विचारले की ती मुसलमान आहे का? जेव्हा पीडितेने 'हो' असे उत्तर दिले तेव्हा अमेरिकन महिलेने तिच्याबरोबर गैरवर्तन केले आणि तिला मारहाण करण्यास सुरवात केली. पीडित महिलेला शिवीगाळही करण्यात आली. दरम्यान, पुणे पोलिसांनी या घटनेबाबत अमेरिकन दूतावासाला माहिती दिली आहे.
पुढे या घटनेबद्दल बोलताना पोलिसांनी सांगितले की, अमेरिकन महिलेचे मानसिक स्थिती ठीक नाही आणि सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडित डॉक्टरने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि पोलिसांनी महिला आरोपीची चौकशी सुरु केली आहे. शिवाय, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने पोलिस कोठडीत असतानादेखील गैरवर्तनही केले. एवढेच नव्हे तर अमेरिकी दूतावासात बोलतानाही ती अपशब्दांचा वापर करत होती.