Urmila Matondkar On Farmer protest & Sharjeel Usmani: शरजील उस्मानी शेतकरी आंदोलन यावर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांची प्रतिक्रिया

त्या म्हणाल्या की, कोणत्याही ठिकाणी शब्द हे अत्यंत जपून वापरावे लागतात. त्यामुळे शरजील उस्मानी नावाच्या इसमाने जे शब्द पुणे येथे वापरले ते अत्यंत दुर्दैवी आणि चुकीचे होते.

Urmila Matondkar | (Photo Credits: Facebook)

अभिनेत्री आणि अलिकडील काळात शिवसेना पक्षात सहभागी झालेल्या उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांनी राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेले शेतकरी आंदोलन (Farmer protest) आणि पुणे येथे शरजील उस्मानी (Sharjeel Usmani) याने केलेल्या वक्तव्यांवर स्पष्ट मतं मांडली आहेत. मातोंडकर यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

या वेळी बोलताना मातोंडकर म्हणाल्या, शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारने तोडगा काढावा. शेतकरी संपूर्ण देशाचा कणा आहेत. त्यामुळे जे कायदे आणले जातात ते शेतकऱ्यांच्या हिताचे असावेत. जर शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे नसतील तर त्याचा उपयोग काय? आज थंडी, उन, वारा, पाऊस याची कोणतीही तमा न बाळगता शेतकरी आंदोलन करत आहे. त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी आज त्याला खलिस्तानी, दहशतवादी, देशद्रोही ठरवले जाते. हे योग्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या लवकर पूर्ण झाल्या पाहिजेत, असे मातोंडकर म्हणाल्या.

शरजील उस्मानी या युवकाने पुणे येथील एल्गार परिषदेत जे वक्तव्य केले त्या वक्तव्यावरही उर्मिला मातोंडकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, कोणत्याही ठिकाणी शब्द हे अत्यंत जपून वापरावे लागतात. त्यामुळे शरजील उस्मानी नावाच्या इसमाने जे शब्द पुणे येथे वापरले ते अत्यंत दुर्दैवी आणि चुकीचे होते. त्याच्या वक्तव्याबाबत पोलीस तपास व्हायला हवा. (हेही वाचा, Urmila Matondkar Birthday: पहिल्या चित्रपटापासून लव स्टोरी पर्यंत 'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकर यांच्याविषयी खास गोष्टी जाणून घ्या)

दरम्यान, महाविकासआघाडी सरकारबाबत विरोधकांनी मुघलाई हा शब्द वापरला होता. त्यावर मुघलाई वैगेरे हे जे शब्द आहेत ते काय केवळ महाराष्ट्रापुरतेच राखून ठेवले आहेत का? असा सवाल उर्मिला मातोंडकर यांनी या वेळी उपस्थित केला. तसेच, महाराष्ट्र सरकारबाबत असे म्हणत असाल तर मग केंद्र सरकारबाबत काय म्हणाल? असा टोलाही मातोंडकर यांनी लगावला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif