उर्मिला मातोंडकर ची CAA वर टीका; Rowlatt Act सोबत तुलना करत इतिहासात 'काळा कायदा' म्हणून नोंद होईल अशी टीपण्णी
तेव्हा ब्रिटिशांना माहित होतं की भारतामध्ये सामाजिक असंतोष होता. तेव्हा ब्रिटिशांनी रौलेट कायदा आणला होता. त्याप्रमाणेच आता 2019 मध्ये CAA आहे. इतिहास या दोन्ही कायद्यांची नोंद 'काळा कायदा' म्हणून करेल. असं म्हणत उर्मिला मातोंडकरने हिंदुत्तत्त्वाद्यांवर टीका केली आहे.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने (Urmila Matondkar) सुधारित नागरिकत्त्व कायदा (Citizenship Amendment Act) हा इतिहासातील काळा कायदा असेल अशी टीपण्णी केली आहे. दरम्यान पुण्यामध्ये आयोजित महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्ताने एका कार्यक्रमात बोलताना उर्मिला हे वक्तव्य केलं आहे. सीएए कायदा मुस्लिम समाजाच्या विरोधी भासवला जात आहे. तो मुस्लिम समाज विरोधी जसा आहे तसाच तो गरिबांच्याही विरोधात आहे. त्यामुळे हा कायदा अमान्य असेल अशा भावना उर्मिला मातोंडकरने व्यक्त केल्या आहेत. CAA: भारतीय नागरिकत्व कसे मिळते? काय आहेत राज्यघटनेतील तरतुदी? वाचा सविस्तर.
1919 साली दुसरं महायुद्ध संपलं होतं. तेव्हा ब्रिटिशांना माहित होतं की भारतामध्ये सामाजिक असंतोष होता. तेव्हा ब्रिटिशांनी रौलेट कायदा आणला होता. त्याप्रमाणेच आता 2019 मध्ये CAA आहे. इतिहास या दोन्ही कायद्यांची नोंद 'काळा कायदा' म्हणून करेल. असं म्हणत तिने हिंदुत्तत्त्वाद्यांवर टीका केली आहे.
उर्मिला मातोंडकरची CAA वर टीका
महात्मा गांधीजी हे केवळ भारत देशाचे नव्हे तर सार्या जगाचे नेते होते. जर कुणी हिंदुत्त्व सर्वाधिक जोपासलं असेलतर ते महात्मा गांधीजी होते. महात्मा गांधीजींच्या हत्येबाबत बोलताना तिने ज्यांनी गांधीजींना मारलं ती व्यक्ती मुसलमान किंवा शीख नव्हती, ती व्यक्ती एक हिंदू होती त्यामुळे मला याबद्दल अधिक काही सांगायचं नाही असं म्हणत तिनं अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. पंतप्रधान आणि नाथूराम गोडसे यांची विचारधारा एकसारखीच, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे वादग्रस्त विधान.
दरम्यान उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता. निवडणूकीत उर्मिलाचा भाजापा उमेदवार गोपाळ शेट्टींनी पराभव केला. त्यानंतर अंतर्गत राजकारणामुळे कॉंग्रेस पक्षाला उर्मिलाने सोडचिठ्ठी दिली. पुढे उर्मिला मातोंडकर शिवसेनेमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा देखील रंगल्या होत्या.