उरण: ONGC प्लांटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने टॅक्सी-बस चालकांना फटका

उरण (Uran) येथे ओनजीसीच्या (ONGC) प्लांटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सीएनजी टॅक्सी, बस आणि कारला फटका बसला आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

उरण (Uran) येथे ओनजीसीच्या (ONGC) प्लांटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सीएनजी टॅक्सी, बस आणि कारला फटका बसला आहे. यामुळे आज सर्व पेट्रोल पंपावर गाड्यांचा लांबलचक रांगा पाहायला मिळत आहेत. यामुळे महानगर गॅस कंपनीला गॅसचा तुडवटा भासत आहे.

पण उरण येथे प्लांटमध्ये बिघाड झाल्याने ग्राहकांना गॅस कमी प्रमाणात मिळणार आहे. यामुळे मुंबईमधील एकूण 6 सीएनजी पुरवठा स्टेशनवर कमी झाल्याने ते बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु घरगुती गॅस धारकांना महानगर कडून याबाबत तोडग काढण्यात येईल सांगण्यात आले आहे.(मुंबई: 2007 च्या घरगुती गॅस सिलेंडर स्फोट प्रकरणी 'हिंदुस्थान पेट्रोलियम' ला 10 लाखांचा दंड)

सीएनजी गॅस पंपावर गाडीत सीएनजी भरण्यासाठी आलेल्या ग्राहकांना हाय डेन्सिटी गॅक्स मिक्स करुन भरला जात आहे. मात्र आज निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे जवळजवळ 6 लाख वाहनांवर याचा परिणाम होऊ शकतो. परंतु ओएनजीसीकडून नैसर्गिक वायुचा पुरवठा पुर्ववत झाल्यांतर नेहमीप्रमाणे गॅस देण्यात येईल असे महानगर गॅस कंपनीकडून सांगण्यात आले आहे.