महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून यूपीएस मदान यांची नियुक्ती
यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांचे नावदेखील चर्चेत होते.
मागच्यावर्षी डी. के. जैन यांची राज्याचे मुख्य सचिव (Chief Secretary) म्हणून नियुक्ती झाली होती, त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांची लोकपालच्या सदस्यपदी निवड केल्याने परत राज्याच्या मुख्य सचिव पदाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र आता हा तिढा सुटला असून यूपीएस मदान (UPS Madan) यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांचे नावदेखील चर्चेत होते. मदान हे 1983च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. सध्याचे मुख्य सचिव डी. के. जैन हे 31 जानेवारी रोजी निवृत्त होणार होते, मात्र त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान त्यांना लोकपालच्या सदस्यपदीदेखील रुजू व्हायचे होते, त्यामुळे मदान यांची निवड करण्यात आली.