ठाणे ते ऐरोली दरम्यान रेल्वेचे डबे घसरले, वाहतूक विस्कळीत; कोणतीही जीवितहानी नाही

यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही किंवा कुठल्याही प्रवाशाला इजा झालेली नाही.

Mumbai locals | File Image | (Photo Credits: PTI)

ठाणे (Thane) ते ऐरोली (Airoli) दरम्यान टीव्ही-85 (ठाणे-वाशी) लोकलचे तीन डबे 35/16-18 किमी वर रुळावरून घसरले. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही किंवा कुठल्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. मात्र सध्या अप आणि डाऊन अशी ट्रान्सहार्बर लाइनवरील (Trans Harbour Line) वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सध्या डबे रुळावर आणण्याचे काम सुरु आहे. मेगाब्लॉक नंतर आज रविवारी घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली आहे. (हेही वाचा: पुरस्थितीमुळे एसटी महामंडळाला 100 कोटींचा फटका)

सध्या ठाणे ते पनवेल, ठाणे ते वाशी आणि ठाणे बेलापूर लोकलसेवा यामुळे बंद आहे. लोकलचे डबे नेमके कोणत्या कारणाने घसरले याविषयी अद्याप माहिती हाती आलेली नाही. अनेक लोकल प्रवाशांनी ठाणे ते पनवेल दरम्यान  लोकल ट्रेन सुरु नसल्याबद्दल एम-इंडिकेटर अॅपवर पोस्ट केले आहे. आता मध्य रेल्वेने याबाबत माहिती देण्यासाठी निवेदन जारी केले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif