Maharashtra Rains Update: मराठवाड्यात अवकाळी पाऊस, राज्यात 18-21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यासह (Marathwada) विदर्भ आणि राज्यातील अन्य भागातही 18 ते 21 मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

Unseasonal Rain | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात (Maharashtra Rains Update) उकाडा वाढलेला असताना आज अचानक पहाटेच्या सुमारास मराठवाड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाड्यासह (Marathwada) विदर्भ आणि राज्यातील अन्य भागातही 18 ते 21 मार्चदरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे शेतक-यांचा जीव टांगणीला लागला आहे. दरम्यान हा अवकाळी पावसाने वातावरणात जरी गारवा जाणवत असला तरीही उकाडा देखील तितकाच वाढणार आहे.

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पावसासह गारपीट झाली आहे. तालुक्यातील हसनाबाद ,तळेगाव, सुरंगळी या भागात पहाटे 5 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झाली आहे. या गारपीठीने पिकांचे अत्यंत नुकसान झाले आहे. मराठवाड्यात आज सकाळी पडलेल्या पावसाने शेतक-यांचा गोंधळ उडाला.हेदेखील वाचा- Weather Update: विदर्भातील अकोला, अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कटकटांसह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

वाशिम जिल्ह्यातही विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट झाल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे या भागातील फळबागासह रब्बी पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ढगांच्या गडगडाटासह लातूर जिल्ह्यात अनेक भागात मध्यरात्री पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी दोन दिवसांपूर्वी एक ट्विट केले होते. ज्यात त्यांनी हवामानातील बदलामुळे विदर्भासह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 18-21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त केली होती.

दरम्यान 18 मार्च रोजी नागपूर (Nagpur), पुणे (Pune) आदी शहरांमध्ये (18 मार्च) सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली होती. महाराष्ट्रातील इतरही काही भागांमध्ये पावसाची (Maharashtra Rains) हजेरी पाहायला मिळाली. नागपूरमध्ये गुरुवारी सकाळीच आकाशात ढग दाठून आले. पुण्यामध्येही पावसाने हजेरी लावली.