Maharashtra Weather Update: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचे संकट, हवामान विभागाने दिला इशारा
आता पुढील २४ तासांत पुन्हा अवकाळी पाऊस पडणार असल्याता इशारा हवामान विभागाने दिला आहे
Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात बदल होताना दिसत आहे. दोन दिवसांपासून राज्यातील अनेक ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे. आता पुढील २४ तासांत पुन्हा अवकाळी पाऊस पडणार असल्याता इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शुक्रवारी पाऊस झाला. पुण्यात काल रात्री चांगलाच पाऊस पडला. मराठवाड्यात पावसामुळे शेतातील पिकांची नासाडी झाली आहे.
पुणे शहर सर्वत्र पाऊस झाला आहे. त्यामुळे नागरिकांना समस्येला तोंड द्यावे लागले आहे. पुढील दिवसांत वातावरण कसे राहिल यांचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे. पुण्यातील खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. अचानक झालेल्या पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. कोकणात विजाच्या कडकडाटीसह पाऊस पडत आहे. चिपळूण, रत्नागिरीसह अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी एक तास मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर गावात रिमझिम पाऊस सुरु होता.आज माथेरान, पेण आणि पुण्यात पावसाची शक्यता आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान झाले आहे. मुंबईतील प्रदुषण रोखण्यासाठी पाऊस फायदेशीर ठरला आहे. मुंबईकरांना पहाटे भरपूर प्रदुषणाला सामाना करावा लागत होता परंतु पावसामुळे प्रदुषण कमी झाले अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. हवेची गुणवत्ता सुधारली आहे. पावसामुळे 200 एक्यूआयवर गेलेली हवेची गुणवत्ता 94 एक्याआयवर खाली आली आहे.