लोकसभा निवडणूक 2019: मुंबई विद्यापीठाने पुढे ढकलल्या 75 परीक्षा; 27 परीक्षांच्या वेळपत्रकात बदल
मात्र मुंबई विद्यापीठाच्या (University Of Mumbai) काही परीक्षा निवडणूकांच्या तारखांमध्ये येत असल्याने विद्यापीठाने सुमारे 75 परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.
Mumbai University Exam Time Table: यंदा लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) 2019 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशात सात आणि महाराष्ट्रात चार टप्प्यात निवडणूका होणार असल्याचं जाहीर झाले आहे. मात्र मुंबई विद्यापीठाच्या (University Of Mumbai) काही परीक्षा निवडणूकांच्या तारखांमध्ये येत असल्याने विद्यापीठाने सुमारे 75 परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. तर 27 वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आले आहेत.लवकरच नवं वेळापत्रक जाहीर करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. Lok Sabha Election 2019 Dates: मुंबई, पुणे, नाशिक, कोकण मध्ये कधी आहे लोकसभा निवडणूक 2019 मतदान? पहा महाराष्ट्र राज्यातील 48 मतदारसंघाचं संपूर्ण वेळापत्रक
कोणकोणत्या विषयांच्या परीक्षा तारखांमध्ये बदल?
मॅनेजमेंट आणि कॉमर्सचे 30, सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजीचे 17, इतर शाखांचे 29 29असे एकूण 76 विषयांच्या परीक्षा आणि लोकसभा निवडणूकीच्या तारखा एकत्र येत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना कमीत कमी त्रास व्हावा याकरिता काही विषयांच्या परीक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहे. लवकरच त्याची माहिती दिली जाईल.
मुंबई विद्यापीठाच्या शाखा मुंबई, ठाणे, रायगड, कोकण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागात आहेत. त्यामुळे या भागातील मतदानाच्या तारखा पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.