Tragic Accident In Gadchiroli: गडचिरोलीमध्ये दुर्दैवी अपघात! इंद्रावती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या 6 मुलांचा बुडून मृत्यू

सर्व मृत मुले तेलंगणातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हापासून आराम मिळवण्यासाठी मुले नदीत आंघोळ करण्यासाठी गेली होती, परंतु अचानक ती जोरदार प्रवाहात अडकली आणि खोल पाण्यात बुडाली.

Tragic Accident In Gadchiroli (फोटो सौजन्य - X/@Deepikasingh043)

Tragic Accident In Gadchiroli: गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातून एक हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. तेलंगणाच्या सीमेवरील मेडिगड्डा जलाशयाजवळ इंद्रावती नदीत (Indravati River) आंघोळ करताना सहा मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही दुःखद घटना शनिवारी संध्याकाळी सिरोंचा तालुक्याच्या सीमेवर घडली. सर्व मृत मुले तेलंगणातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उन्हापासून आराम मिळवण्यासाठी मुले नदीत आंघोळ करण्यासाठी गेली होती, परंतु अचानक ती जोरदार प्रवाहात अडकली आणि खोल पाण्यात बुडाली.

घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलिसांनी स्थानिक मच्छीमार आणि गोताखोरांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली. शनिवारी रात्रभर नदीत शोध सुरू होता. रविवारी सकाळी पुन्हा मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू करण्यात आले. प्रशासन, पोलिस आणि स्थानिक लोकांचे पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत.

इंद्रावती नदीत आंघोळीसाठी गेलेल्या 6 मुलांचा बुडून मृत्यू

मृत मुलांच्या कुटुंबियांवर ढासळला दु:खाचा डोंगर -

या अपघातानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मुलांच्या कुटुंबातील सदस्य अश्रू ढाळत आहेत. पावसामुळे इंद्रावती आणि गोदावरी नद्यांच्या पाण्याची पातळी खूप वाढली आहे, ज्यामुळे प्रवाह वाढला आहे. या प्रवाहात मुले वाहून गेल्याचं सांगण्यात येत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement