बेरोजगार तरुणाचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न

अनेक काळ प्रयत्न करुनही त्याला नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तो हताश होता. हा तरुण मंत्रालयाच्या गार्डन गेटवर सोमवारी दाखल झाला. या तरुणाने सोबत आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेत आत्महत्या करण्याच प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीत हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतले.

Ministry Bulding Mumbai | (file photo)

Unemployment In Maharashtra: मंत्रालयाच्या गार्डन गेटवर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पुन्हा एकदा मंत्रालय (Ministry Bulding Mumbai) परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी या तरुणाला वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. आत्महत्येचा प्रयत्न करु पाहणाऱ्या या तरुणाचे नाव समजू शकले नाही. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी ट्विट करुन या घटनेची माहिती दिली. तसेच, सरकारचा निषेध नोंदवला.

प्राप्त माहितीनुसार हा तरुण बेरोजगार होता. अनेक काळ प्रयत्न करुनही त्याला नोकरी मिळत नव्हती. त्यामुळे तो हताश होता. हा तरुण मंत्रालयाच्या गार्डन गेटवर सोमवारी दाखल झाला. या तरुणाने सोबत आणलेले रॉकेल अंगावर ओतून घेत आत्महत्या करण्याच प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीत हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतले. (हेही वाचा, शिवशाही बस उलटली, दोन ठार, इतर प्रवासी जखमी; नाशिक-मुंबई-आग्रा हायवेवर अपघात)

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी या घटनेनंत ट्विटरद्वारे सरकारचा निषेध केला आहे. मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मंत्रालयासमोर बेरोजगार तरुणाने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही बाब दुर्दैवी आहे. वर्षाला २ कोटी रोजगार देतो म्हणून सुशिक्षित तरुणांची फसवणूक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो! तरुणांनो आत्महत्या करू नका, तुम्हाला आत्महत्या करण्यास भाग पाडणाऱ्या सरकारला धडा शिकवा.