मुंबई: Smart Maitrin प्रोजेक्ट अंतर्गत महिला पोलिस अधिकार्यांसाठी खास सॅनिटरी पॅड वेंडींग मशीन्सची सोय
पोलिस वेल्फेअर स्कीमच्या (Police Welfare Scheme) अंतर्गत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एनजीओसोबत एकत्र येऊन 100 सॅनिटरी पॅड वेडिंग मशिन्स (Sanitary Pad Vending Machines) महिला पोलिस कर्मचार्यांसाठी खुली केली आहेत.

"Smart Maitrin"या प्रोजेक्ट अंतर्गत 140 मशीन्स मुंबई शहरात 93 विविध पोलिस स्टेशन्समध्ये बसवण्यात आले आहेत. एकूण पोलिस फोर्समध्ये सुमारे 20% महिला आहेत. मासिकपाळी ही अनिश्चित आणि नैसर्गिक असल्याने अनेकदा महिलांची कामाच्या ठिकाणी गैरसोय होऊ शकते. हे ओळखून हा उपाय फायदेशीर असल्याची माहिती नियाती ठक्कर या डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिसने एएनआयशी बोलताना दिली आहे.
मागील आठवड्यात पोलिस हेडक्वॉर्ट्समध्येही अशाच प्रकारे वेडिंग मशीन्स इन्स्टॉल करण्यात आलं आहे. संजय बर्वे आणि त्यांच्या पत्नी यांनी या मशीन्सचे उद्धाटन केले आहे.