Under-Construction Metro Pillar Collapsed in Chembur: सुमन नगर भागात निर्माणाधीन मेट्रोचा काही भाग कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही
कोणताही सपोर्ट न देता या वीस फुटांच्या सळ्या उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
मुंबई (Mumbai) मध्ये चेंबूर (Chembur) भागात मेट्रोचं बांधकाम सुरू असताना अर्धवट बांधकामाचा काही भाग आजुबाजूच्या निवासी सोसायटींवर कोसळला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मेट्रोच्या सळ्या सुमन नगर सोसायटी वर कोसळल्या आहेत. ही घटना सायन ट्रॉम्बे रोड (Sion Trombay Road) वर ही घटना घडली आहे. सुमारे 20 फूट सळ्या टाकून उभारलेले काम कोसळलं आहे. Metro Line 4 (Wadala-Ghatkopar-Ksaravadali) चं काम सुरू असताना हा अपघात झाला आहे.
सुमन नगर भागात रहिवासी सोसायटी मध्ये सुरक्षा रक्षकाच्या खोलीवर या सळ्या पडल्या. त्यामुळे या भागातील नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली. पिलरचे काम डाव्या बाजूला पडलं. हे चुकून उजव्या साईडला पडलं असतं तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. Mumbai Metro च्या प्रवाशांना आता मिळणार wearable wristband; पहा तिकिटाचा हा नवा पर्याय नेमका कसा?
सुमन नगर मध्ये मेट्रोच्या बांधकामाचा भाग कोसळला
सुमननगरच्या सिग्नलवर ही घटना घडल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कोणताही सपोर्ट न देता या वीस फुटांच्या सळ्या उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मुंबईत सुरू असलेल्या मेट्रोच्या कामावर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.