मुंबई: मुलगा मस्ती करायचा म्हणून काकानेचं काढला काटा; मोबाईल चार्जरच्या वायरने आवळला गळा
मुंबईतील घाटकोपर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सख्या काकाने 15 वर्षाचा मुलगा मस्ती करतो म्हणून त्याची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली आहे. शिव पवार असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. तसेच हिंमत गोयल असं आरोपी काकाचं नाव आहे. घाटकोपर पश्चिमेतील गोळीबार रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गोळीबार रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईतील घाटकोपर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सख्या काकाने 15 वर्षाचा मुलगा मस्ती करतो म्हणून त्याची मोबाईल चार्जरच्या वायरने (Mobile Charger Wire) गळा आवळून हत्या (Murder) केली आहे. शिव पवार (Shiv Pawar) असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. तसेच हिंमत गोयल असं आरोपी काकाचं नाव आहे. घाटकोपर (Ghatkopar) पश्चिमेतील गोळीबार रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे गोळीबार रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हत्या करण्यात आलेल्या शिवची आई कामाला गेली म्हणून तो आपल्या आत्याच्या घरी खेळत होता. त्यानंतर काही वेळानंतर त्यांची आत्याही कामानिमित्त बाहेर गेली. त्यानंतर शिवने आपल्या काकांसोबत मस्ती करण्यास सुरुवात केली. परंतु, शिवचा काका हिंमत याला शिव वारंवार मस्ती करतो याचा राग आला. त्यामुळे त्याने शिवला मारहाण करण्यास सुरुवात केली. शिव स्वत:ला वाचवण्यासाठी आपल्या घरी पळाला. (हेही वाचा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थान परिसरातून पिस्तुलधारी तरुणास अटक)
आरोपी हिंमत याने हातात मोबाईलचे चार्जर घेऊन शिवमागे धाव घेतली आणि शिवच्या घरात जावून त्याचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळला. शिवचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच आरोपी हिंमतने शिवच्या घराला कुलूप लावलं आणि पोलिस स्टेशन गाठलं. हिंमतने पोलिसांना शिवची हत्या त्याच्या एका चुलत भावाने केल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी या सर्व प्रकाराची कसून चौकशी केल्यानंतर आरोपी हिंमनेचं शिवची हत्या केल्याचे उघड झाले.
दरम्यान, शिवच्या आईने कामावरून आल्यानंतर घराला कुलूप लावलेलं पाहिलं. त्यानंतर तिने शेजाऱ्याच्या मदतीने कुलूप तोडल. त्यानंतर तिला घरात शिव बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. त्यानंतर शिवला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल. परंतु, डॉक्टरांनी शिवला मृत घोषित केलं. त्यानंतर शिवच्या शवविच्छेदन अहवालात त्याची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या करण्यात आल्याच उघड झालं.
(The above story first appeared on LatestLY on Mar 02, 2020 05:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

